सुभाष धोटेंनी केली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:21 AM2020-05-15T11:21:10+5:302020-05-15T11:22:18+5:30

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शुक्रवारी सकाळी चिंचोली (बु), कवीठपेठ आणि नलफडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या नाला खोलीकरण कामाचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली.

Subhash Dhote inspects Mahatma Gandhi National Employment Guarantee work | सुभाष धोटेंनी केली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कामाची पाहणी

सुभाष धोटेंनी केली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कामाची पाहणी

Next
ठळक मुद्देमजूरांशी हितगुज करीत सुरक्षा उपाययोजनांची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शुक्रवारी सकाळी चिंचोली (बु), कवीठपेठ आणि नलफडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या नाला खोलीकरण कामाचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली.
या प्रसंगी अमदार धोटे यांनी प्रत्यक्षात मजुरांशी हितगुज साधुन त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या सुरक्षितेविषयी जाणून घेतले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांना मास्क आणि हात धुण्यासाठी साबण पुरविले जाते की नाही, पिण्याच्या पाण्याची सोय आहे की नाही हे प्रतेक्षात पाहणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामपंचायत चिंचोली बु. येथील कार्यालयात भेट देऊन गावातील समस्या जाणून घेतल्या, या प्रसंगी त्यांनी चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा भेट दिली. येथील डॉक्टर, अशावर्कर यांच्या कामाचा आढावा घेतला. कोरोणा आणि अन्य आजाराच्या बाबत योग्य दक्षता आणि उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
या प्रसंगी राजुराचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, विस्तार अधिकारी मिलिंद कुरसंगे, चिंचोली बु. येथील सरपंच माधुरीताई नागापुरे, उपसरपंच मारोती नेव्हारे, माजी सरपंच धनराज चिंचोलकर, बालाजी बोरकुटे ग्रा.प. सदस्य, बंडुजी रामटेके, अरुण सोमलकर, पांडुरंगजी वडस्कर, बंडूजी एकोणकर, महादेव बोबाटे, ग्रामसेवक गोपाल नैताम, रोजगार सेवक अरुण भोंगळे यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Subhash Dhote inspects Mahatma Gandhi National Employment Guarantee work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार