गुंठेवारीचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:07 AM2017-11-17T01:07:24+5:302017-11-17T01:07:38+5:30

गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने...

Submit a Gundewadi Report | गुंठेवारीचा अहवाल सादर करा

गुंठेवारीचा अहवाल सादर करा

Next
ठळक मुद्देराहुल पावडे : मनपाच्या आढावा सभेत १५ दिवसांचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करावी व त्यासंबंधीचा अहवाल १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिले आहे.
महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित गुंठेवारी प्रकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त बालचंद्र बेहेरे, नगररचना विभागाचे सगरे, बाहेकर, गौतम, भोयर, देवतळे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या नगरचना विभागाकडे प्राप्त एकूण प्रकरणातील ७३८ प्रकरणे संबंधीतांना कळविण्यात आली आहेत. उर्वरीत एक हजार ३८० प्रकरणांची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे लवकर निकाली निघू शकतात. त्यामुळे सभेसमोर ठेऊन ही प्रकरणे निकाली काढावे. रस्त्यांची व्याप्ती लक्षात घेऊन मनपा अधिनियमानुसार असलेली प्रकरणे अधिकाºयांनी निकली काढावे, असे निर्देश पावडे यांनी यावेळी दिले.
गुंठेवारीसंदर्भात दोन महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. बसस्थानक, शाळा, उद्यानाची प्रकरणे वेगळी करा, पुरबाधित क्षेत्रातील पाचशे ते सातशे प्रकरणे आहेत. या प्रकरणांना नाहरकत प्रमाणपत्र देणे शक्य नाही. परंतु सिंचन विभागाच्या अधिकाºयांशी बैठक घेऊन तोडगा काढला जाऊ शकते, असे सुतोवाच पावडे यांनी केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पावडे यांनी ही बैठक बोलावली होती.
शासनाच्या निर्देशानुसारच कामे व्हायला हवीत. महानगरपालिका ही संस्था आहे. गुंठेवारीने महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे अधिकाºयांनी गांभीर्याने प्रकरणे निकाली काढण्याच्या कामाची गती वाढवावी. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल १५ दिवसांत सादर करावा, जेणेकरुन प्रकरणातील त्रुटी दूर करता येऊ शकतील, असेही पावडे म्हणाले.

मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार
गुंठेवारीची प्रकरणे निकाली निघाल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने ही प्रकरणे तात्काळ निकाली काढावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच अधिकाºयांकडून वेळेत काम पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. शहरातील गुंठेवारीची प्रकरणे निकाली काढण्याचे काम अनेक वर्षे बंद होते. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकणातून मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

Web Title: Submit a Gundewadi Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.