ख्रिस्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:41+5:302021-03-27T04:28:41+5:30

ब्रह्मपुरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने बालक दिनाचे अैाचित्य साधून ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्वच शाळांमधील ...

Success of Khristanand Vidyalaya students | ख्रिस्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ख्रिस्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

Next

ब्रह्मपुरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने बालक दिनाचे अैाचित्य साधून ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्वच शाळांमधील पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बाल दिवस सप्ताह साजरा करण्यात आला होता. यामध्ये सात गटांमध्ये उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमाचे सर्व व्हिडीओ, फोटो हे बाल दिवस २०२० या हॅशटॅगचा वापर करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या माध्यमातून अपलोड केले होते. यात ब्रह्मपुरी तालुकास्तरीय निकाल नुकताच जाहीर झालेला असून, स्थानिक ख्रिस्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.

पत्रलेखन स्पर्धेत विधान मंगेश बन्सोड वर्ग ४ याने प्रथम, अभिनव विकास फुलझेले वर्ग ४ याने दुसरा, मो.सिद्धिक नाजिम शेख याने तिसरा, पोस्टर काढणे या स्पर्धेत प्रथम श्रेयस मारोती बावनकर वर्ग १०, द्वितीय लुकलेशा वसंत भेंडारकर वर्ग ९वा, निबंध लेखन स्पर्धेत प्रथम तन्मय सुरेश देशमुख वर्ग ११, द्वितीय मनस्वी अशोक पटेल वर्ग १२, तृतीय मानस गजानन शेंडे वर्ग ११, माध्यमिक गटात प्रथम उज्ज्वल विवेक धोटे वर्ग १०, व्हिडीओ या स्पर्धेत प्रथम मानस गजानन शेंडे वर्ग ११, द्वितीय साहिल विठ्ठल पुसटकर वर्ग १२, बालसंमेलन या स्पर्धेत प्रथम अवनी सतीश नारडांगे वर्ग १, तृतीय निधी येशुदास ढोरे वर्ग ५वा यांनी क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे व्यवस्थापक फादर जोसेफ कलथ्थील, मुख्याध्यापिका सिस्टर दीपा जोस, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेरिन, तसेच सर्व शिक्षकांनी काैतुक केले आहे.

Web Title: Success of Khristanand Vidyalaya students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.