कठोर परिश्रमातूनच यशप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:36 PM2018-11-12T22:36:39+5:302018-11-12T22:36:55+5:30
कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही जग जिंकू शकता, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही जग जिंकू शकता, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
शेर ए-हिंद शेर ए म्हैसूर टिपू सुलतान यांची २६८ वी जयंती रविवारी चंद्रपुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान रविवारी सायंकाळी शहरातील मुख्य मार्गाने हजरत टिपू सुलतान फांऊडेशनच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. माधुरी मानवटकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अमजद शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे हरिभाऊ पाथोडे, अनिल दहागावकर, आसरा फांऊडेशन नागपूरच्या जीशान शेख, जिलानी भाई, प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथील समीर सिद्दिकी, सहाय्यक आयुक्त नितीश पाथोडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना समीर सिद्दीकी म्हणाले, टिपू सुलतान हे धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी हिंदू मंदिरासाठी केलेल्या कार्यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
नितीश पाथोडे यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.तसेच स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी बनण्याचा मुलमंत्र उपस्थितांना दिला. तर मुजावर अली यांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. तसेच पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर टिपू सुलतान यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करणयात आले.
संचालन नौशाद सिद्दिकी, प्रास्ताविक अली असगर, आभार झुबेर आझाद यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक तसेच टिपू सुलताना संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.