मनपाचा स्वच्छतेसाठी असाही उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:32 AM2021-08-25T04:32:58+5:302021-08-25T04:32:58+5:30
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरात २२ ऑगस्ट रोजी ‘स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार ...
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरात २२ ऑगस्ट रोजी ‘स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेषसा ’ हा उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आला. या मोहिमेंतर्गत ‘गंदगी फैलाने और थुकने से आझादी ’ या संकल्पनेवर साप्ताहिक मोहीम आयोजित करून यावर आधारित उपक्रम सात दिवस राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत आम्रपाली भवन शांतीनगर, बंगाली कॅम्प, परिसरात युवक, लहान मुले तसेच महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्याने विविध रोगांचा संसर्ग कशाप्रकारे होऊ शकतो, त्याचे दुष्परिणाम काय, यावर प्रतिबंधात्मक उपाय काय यासंबंधी माहिती देण्यात आली. लहान मुलांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. उत्कृष्ट तीन चित्रांची निवड करून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अस्वच्छता पसरवू नये याबाबत जनजागृती करण्यात आली.