Video: सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर भडकले, पूरग्रस्त गावांची पाहणी करताना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:39 PM2022-07-22T12:39:05+5:302022-07-22T12:44:33+5:30
मुनगंटीवारांचा हा व्हिडिओ झालाय वायरल, या गावाच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला बसला पुराचा फटका
चंद्रपूर - जिल्ह्यातील हृदयद्रावक पूर परिस्थितीत अधिकारी वर्गाची असंवेदनशीलता, ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पोचलेल्या आ. मुनगंटीवार यांचा रुद्रावतार धारण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सर्वाधिक झळ पोहोचलेल्या पळसगाव येथे मदत नाकारणाऱ्या वेकोली अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. सुरक्षितस्थळ म्हणून वेकोलिचा हॉल देण्यास अधिकाऱ्यांनी दिला होता नकार. त्यामुळे, काही तासात मदत पोहोचवा अन्यथा हिशोब करतो, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे.
मुनगंटीवारांचा हा व्हिडिओ झालाय वायरल, या गावाच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला बसला पुराचा फटका. मात्र, सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती दाखविला हलगर्जीपणामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक पूर परिस्थितीत अधिकारी वर्गाची असंवेदनशीलता पुढे आल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा हा संताप व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला आहे.
चंद्रपूर - पूरग्रस्त भागाची पाहणी करताना अधिकाऱ्यांवर भडकले आमदार मुनगंटीवार pic.twitter.com/hJAxbGvdgz
— Lokmat (@lokmat) July 22, 2022
दरम्यान, या गावाच्या आसपास कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे चुकीच्या पद्धतीने उभे केल्याने गावाला पुराचा फटका बसला. मात्र, सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती हलगर्जीपणा दाखवत महापुरात मदत नाकारली. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार अधिकारी वर्गावर चांगलेच भडकले होते. या अधिकाऱ्यांना फैलावर घेत मुनगंटीवार यांनी चांगलंच सुनावलं, हे या व्हिडिओतून दिसून येते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.