उपाशी वाघ मृत्यु प्रकरणाच्या चौकशीचा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:37 PM2018-02-26T16:37:29+5:302018-02-26T16:37:37+5:30
चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत.
जखमी वाघावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असताना उपचार करण्यात आले नाही तसेच ट्रॅक्युलायझेशनची परवानगी देण्यासाठी विलंब करण्यात आला या बाबी अतिशय गंभीर आहेत. वन विभागातर्फे व्याघ्र संवर्धन व संरक्षण या संदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असताना अशा घटना घडणे ही दुर्देवी बाब आहे. या प्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाचे सचिव तसेच वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिल्या आहेत.