मिंडाळ्यात युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:33+5:302021-02-23T04:44:33+5:30

युवतीचे आणि तिच्या आईचे मोबाईलवरून किरकोळ भांडण झाले होते. स्वीटी वसंत शेंडे असे युवतीचे नाव असून, ती गावच्याच कनिष्ठ ...

Suicide of a young woman in Mindala | मिंडाळ्यात युवतीची आत्महत्या

मिंडाळ्यात युवतीची आत्महत्या

Next

युवतीचे आणि तिच्या आईचे मोबाईलवरून किरकोळ भांडण झाले होते. स्वीटी वसंत शेंडे असे युवतीचे नाव असून, ती गावच्याच कनिष्ठ महाविद्यालयात ११ व्या वर्गात शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी स्वीटी आणि तिच्या आईचे मोबाईलवरून किरकोळ भांडण झाले. याचा स्वीटीला राग आला. रागाच्या भरात ती घराबाहेर पडली. राग शांत झाल्यावर ती घरी येईल असे कुटुंबीयांना वाटले. पण स्वीटी घरी आलीच नाही. कुटुंबीयांनी मग नातेवाईकांकडे विचारणा केली असता, ती आली नसल्याचे सांगितले.

कुटुंबीय सोमवारी नागभीड पोलिसात तक्रार देण्यासाठी आले असता स्वीटीचा मृतदेह घरच्याच शेतातील विहिरीत तरंगताना दिसत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपास ठाणेदार मडामे करीत आहेत.

Web Title: Suicide of a young woman in Mindala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.