उन्हाळ्यात पाणीविक्री वाढण्याऐवजी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:35 AM2021-04-30T04:35:55+5:302021-04-30T04:35:55+5:30

चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात कॅनद्वारे थंड पाण्याची विक्री केली जाते. बहुतांश शासकीय कार्यालय, छोटे-मोठे दुकानदार, हॉटेल, व्यावसायिक, तसेच अनेकांच्या ...

In the summer, water sales declined rather than increased | उन्हाळ्यात पाणीविक्री वाढण्याऐवजी घटली

उन्हाळ्यात पाणीविक्री वाढण्याऐवजी घटली

Next

चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात कॅनद्वारे थंड पाण्याची विक्री केली जाते. बहुतांश शासकीय कार्यालय, छोटे-मोठे दुकानदार, हॉटेल, व्यावसायिक, तसेच अनेकांच्या घरी कॅनचे पाणी पिण्यात येते. त्यामुळे मागील काही वर्षांत हा व्यवसाय चांगलाच फोफावत चालला आहे. उन्हाळ्यात तर या व्यावसायिकांची चांदी असते. लग्नसोहळे व इतर कार्यक्रमात कॅनच्याच पाण्याचा वापर केला जातो, परंतु मागील वर्षांपासून ऐन लग्नसराईतच लॉकडाऊन येत असल्याने, या विक्रेत्यांना मोठे संकट कोसळले आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या संचारबंदीमुळे सर्व दुकाने, खासगी कार्यालये बंद आहेत. केवळ काही मोजक्याच घरी कॅनचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे जारची केवळ २५ टक्केच विक्री होत आहे. यामुळे प्लान्टचा, वाहतूक, नोकरांचा पगार, भाडे किंवा कर्जाचे हप्ते यावर होणार खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती या विक्रेत्यांची झाली आहे.

बॉक्स

अनेक व्यावसायिकांकडे परवाना नाही

कॅनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांना केंद्रीय भूजल बोर्ड व अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना घ्यावा लागतो. मात्र, शहरातील बहुतांश विक्रेत्यांकडे असा परवाना नाही. यापूर्वी मनपाने अशा विक्रेत्याना नोटीस बजावले होते. काही दिवस कॅन वापट बंद होते. मात्र, पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्यात आला. शहरातील पाणी जार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी खासगी बोअरच्या पाण्याचा किंवा विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. प्लान्टमध्ये त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, त्या पाण्याची विक्री केली जाते.

Web Title: In the summer, water sales declined rather than increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.