उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:47 AM2018-12-24T00:47:03+5:302018-12-24T00:48:11+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील परंतु, चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्दचे पाणी मिळावे, यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील परंतु, चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्दचे पाणी मिळावे, यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून धरणात उपलब्ध पाणी साठ्यानुसार व गरजेनुसार सिंचनाकरिता पाणी पुरवठा करण्याचे नियोजन गोसेखुर्द उपविभागाच्या अभियंत्यांनी केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. त्यामुळे शेतकºयांना उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळणार असल्याने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव, पिंपळगाव (भो) जि. प क्षेत्रातील तोरगाव (बु), कोलारी, बेलगाव, देउळगाव व परिसरातील गावांपर्यंत सन २०१९ च्या उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळावे, यासाठी चंद्रपूर जि. प. चे. उपाध्यक्ष क्रीष्णा साहारे, माजी सरपंच योगेश राऊत यांनी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे आमदार भांगडिया यांनी गोसेखुर्दच्या अधिकाºयांशी चर्चा करुन सतत पाठपुरावा केला.
त्यामुळे गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे पाणी १ ते ३० किमीपर्यंतच्या विकसीत लाभक्षेत्रातील शेतीसाठी २०१९ च्या उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरवठा करण्याकरिता गोसेखुर्द प्रकल्प मंडळ नागपूर विभागाचे अधीक्षक, अभियंता यांनी नियोजन केल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. संबंधित क्षेत्रातील पाणी वापर लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज संस्थेच्या माध्यमातून गोसेखुर्द उपविभागाच्या सादर करावे, तसेच मागील पाणी पट्टी थकबाकी त्वरीत भरावी, थकबाकीधारकांचा अर्ज नामंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांची प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.