सूर्याचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:46 PM2018-03-30T23:46:45+5:302018-03-30T23:46:45+5:30

चंद्रपूर जिल्हा उन्हाळ्यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. तप्त उन्हाच्या झळा आता चंद्रपूरकरांना बसू लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

The sun has increased | सूर्याचा पारा चढला

सूर्याचा पारा चढला

Next
ठळक मुद्देचंद्रपूर @ ४२.५ : दाहकतेमुळे नागरिक हैराण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा उन्हाळ्यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. तप्त उन्हाच्या झळा आता चंद्रपूरकरांना बसू लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सुर्याचा पारा ४२.५ अंशापर्यंत गेला आहे. आज शुक्रवारी ४२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असली तरी तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून याचा जनजीवनावरही परिणाम पडत आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तीव्रतेने उभा ठाकला आहे.
‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्याला ठाऊक आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहून यावर्षी उशिराने लागली. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन्ह तापू लागले.
आता सुर्याने आपला प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. मार्च महिन्याच्या शेवटचा दिवस शिल्लक आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवारीही सुर्याचा पारा वाढलेलाच होता. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत.
ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
जसजशे उन्ह तापू लागले आहे, तसे जलाशय, नदी, तलाव-बोड्यातील पाणी आटू लागले आहे. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. एका गावातील एकाच विहिरीवर दोन गावातील गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.
‘मे’ हीट कसा असेल?
आता दोन दिवसाने एप्रिल महिना सुरू होत आहे. दुसरीकडे आतापासूनच सूर्याने नागरिकांच्या नाकीनऊ करून टाकले आहे. तप्त सूर्यकिरणे असह्य होत आहेत. आताच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाºया उष्णतेची लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.

Web Title: The sun has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.