चंद्रपूर शहरातील संडे मार्केट पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:59+5:302021-07-03T04:18:59+5:30
चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून संडे मार्केट भरतो. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊनमुळे संडे मार्केट बंद झाले. राज्य सरकारने ...
चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून संडे मार्केट भरतो. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊनमुळे संडे मार्केट बंद झाले. राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली, तरी संडे मार्केटमधील व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे संडे मार्केटमध्ये दुकाने थाटणाऱ्या २०० लोकांच्या रोजगाराचा प्रश्न प्रलंबित होता.
गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना संडे मार्केटमधील व्यावसायिकांना दुकाने थाटण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या. त्यामुळे संडे मार्केटचा प्रश्न सुटला असून, रविवारपासून संडे मार्केट सुरू होणार आहे. निवेदन देताना समिस्ता समारुद्दीन फारुकी, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, उपाध्यक्ष हर्षा चांदेकर, लता बारापात्रे, मंजू भारती, किरण वानखेडे, कांचन रसाड, कविता मेश्राम, पल्लवी वानखेडे, संगीता बोरकर, रेणू सोनटक्के, सबिया पठाण, मंजू झाडे आदी उपस्थित होते.