शहरातील संडे मार्केट कायम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:06 PM2018-08-11T22:06:31+5:302018-08-11T22:06:48+5:30
उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार संडे मार्केट आता बंद झाले असून कुठल्याही विक्रेत्यांना आता आंबेडकर चौक ते बिनबा गेट रोडवर कुठल्याही स्वरूपाची दुकाने लावता येणार नाही, अशी मािहती मनपाचे जनसंपर्क अधिकारी युद्धिष्ठर रैच यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार संडे मार्केट आता बंद झाले असून कुठल्याही विक्रेत्यांना आता आंबेडकर चौक ते बिनबा गेट रोडवर कुठल्याही स्वरूपाची दुकाने लावता येणार नाही, अशी मािहती मनपाचे जनसंपर्क अधिकारी युद्धिष्ठर रैच यांनी दिली.
मागील एक ते दीड वर्षापासून बिनबा गेट मार्गावर दर रविवारी विक्रेत्यांद्वारे अनधिकृतरित्या व्यवसाय केला जात होता. या संडे मार्केटचे स्वरूप आले होते. सदर मार्केटमध्ये कुठल्याही स्वरूपाची शिस्त पाळली जात नसल्याने तेथील रहिवासी व जागरूक नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे मनपा प्रशासनाने ही दुकाने इतरत्र हलविण्यास कळविले होते. परंतु सदर विक्रेत्यांनी त्याविरूद्ध न्यायालयाचा मार्ग पत्करला होता. दरम्यान, प्रथम जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने मनपाची भूमिका योग्य ठरवून संडे मार्केट बंद करण्याचा आदेश दिला आहे.
याआधी जिल्हा सत्र न्यायालयाने बंदीचा आदेश दिल्यानंतरही व्यावसायिकांनी रविवारी दुकान थाटून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला होता. याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली होती, असेही जनसंपर्क अधिकारी रैच यांनी कळविले आहे.