चंद्रपुरातील ‘संडे मार्केट’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:02 PM2018-07-30T23:02:55+5:302018-07-30T23:06:54+5:30
महानगर परिषदेतर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे दर रविवारी संडे मार्केट भरत होता. यामध्ये शहरातील तसेच जिल्ह्याभरातील शेकडो छोटे-मोठे व्यावसायिक हातठेल्यावर विविध वस्तुंची विक्री करीत होते. मात्र नागपूर खंडपीठाने केवळ नऊ दुकानादारांना याठिकाणी बसण्याची परवानगी दिली असून प्रतिवादींना येत्या ३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आजचा संडे मार्केट भरला नसल्याने याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगर परिषदेतर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे दर रविवारी संडे मार्केट भरत होता. यामध्ये शहरातील तसेच जिल्ह्याभरातील शेकडो छोटे-मोठे व्यावसायिक हातठेल्यावर विविध वस्तुंची विक्री करीत होते. मात्र नागपूर खंडपीठाने केवळ नऊ दुकानादारांना याठिकाणी बसण्याची परवानगी दिली असून प्रतिवादींना येत्या ३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आजचा संडे मार्केट भरला नसल्याने याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
चंद्रपुराती संडे मार्केट नावाने प्रसिद्ध असलेल्या बाजारात सुमारे अडीचशे ते तीनशेच्या सुमारास नागरिक दुकाने थाटत होती. बाजाराच्या गर्दीमुळे वाहतूक खोळबंत होती. मात्र त्यामुळे बाजार हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आठ जणांनी सिव्हिल कोर्टात याचिका दाखल केली. तीनशे जणांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. कोर्टाने त्यांना संरक्षण दिले. याविरूध्द मनपाने जिल्हा न्यायालयात अपील केली. जिल्हा न्यायालयाने आठ जणांची मागणी रद्द करून मनपाची अपील मान्य केली. जिल्हा न्यायालयाच्या या आदेशाला आठ जणांनी हायकोर्टात आव्हान दिले. न्या. सुनील शुक्रे यांनी केवळ आठ जणांना बाजारात बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट येथे मागील काही महिन्यांपासून दर रविवारी संडे मार्केट भरत होता. मात्र त्याठिकाणी केवळ नऊ जणांना बसण्याची परवानगी न्यायालयाने दिल्याने रविवारी भरणारा संडे मार्केट बंद झाला आहे. परिणामी येथे बसणाºया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष घालून तातळीने उपाययोजना करावी, अशी मागणी याठिकाणी बसणाºया व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.