जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:15+5:302021-09-19T04:28:15+5:30

ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोणाच्या संशयावरून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात ...

Superstition eradication program will be implemented in the district | जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविणार

जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविणार

Next

ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोणाच्या संशयावरून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेठी, आमदार अभिजित वंजारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग अमोल यावलीकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सभेत जादूटोणाच्या संशयावरून होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी कृती कार्यक्रम सादर केला. प्रत्येक गावात जादूटोणाविरोधी कृतिदल निर्माण करावा. संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरेल असा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम राबविताना जिल्ह्यातील फंडातून तरतूद करण्यात येईल. प्रत्येक गावात अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येतील, अशी ग्वाही दिली. अधिकाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्या समन्वयातून काम करावे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अंधश्रद्धेच्या घटना जिल्ह्यात होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशाही सूचना विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

बैठकीला अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, नागभीड तालुका सचिव यशवंत कायरकर, ब्रह्मपुरी तालुका संघटक बालाजी दमकोंडवार, डॉ. शशिकांत बांबोळे उपस्थित होते.

180921\img-20210918-wa0159.jpg

बैठकीला उपस्थित पालकमंत्री तथा अधिकारी

Web Title: Superstition eradication program will be implemented in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.