मागणीपत्रात अडला टीएचआरचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:21+5:302020-12-06T04:29:21+5:30
शहरी प्रकल्पातील बचतगट महिलांसमोर संकट सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर : अंगणवाड्यांतील मुलांना पूरक पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. हे काम ...
शहरी प्रकल्पातील बचतगट महिलांसमोर संकट सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर : अंगणवाड्यांतील मुलांना पूरक पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. हे काम बचतगटांकडे आहे. ग्रामीण भागात पूरक पोषण आहार पुरवठा सुरू आहे. मात्र, शहरी प्रकल्पातील गटांना अद्याप मागणीपत्र मिळाले नाही. त्यामुळे टीएचआर पुरवठा सध्या बंद आहे. आयुक्तालयाने मागणी पत्र देऊन टीएचआर पुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला बचतगट महासंघाने केली आहे.
पूरक पोषण आहार पुरवठा आणि गरम ताजा पुरवठा टेंडर सप्टेंबर २०१९ आणि फेरनिविदा २०२० मध्ये काढण्यात आली. यात निवड झालेल्या बचतगटांना नियोजित समितीमार्फत उत्पादन केंद्रांना भेट देऊन कार्यक्षम गटांना ऑक्टोबर महिन्यात टीएचआर पुरवठा करण्याबाबत पत्र देण्यात आले. त्याअनुशंगाने ग्रामीण प्रकल्पात टीएचआर पुरवठा सुरू आहे. मात्र, शहरी प्रकल्पातील गटांना अद्याप मागणीपत्र मिळाले नाही. टीएचआर उत्पादन करणाऱ्या मशीन, साहित्य, गोदामाचा किराया, वीजबिल, पाण्याच्या बिलाचा भार गटावर पडत आहे. या कामासाठी बचतगटाने मशिनी घेतल्या. मात्र, आता काम बंद असल्याने त्या धूळखात पडल्या आहेत. मागणीपत्र देण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याचा काहीच ङ्कायदा झाला नाही. त्यामुळे आता बचतगटाच्या महिला आंदोलनाच्या तयारीत आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सुनीता लांडे, वैशाली दिघोरे, सुशीला मत्ते यांचा समावेश होता.