नवीन रेशनकार्डधारकांना अन्नधान्य पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:51+5:302021-07-02T04:19:51+5:30
चंद्रपूर : स्वस्त धान्याचे नवीन इष्टांक पुरवठा विभागाने अद्याप मंजूर न केल्याने सन २०२०-२०२१ मधील नवीन कार्डधारकांना प्राधान्य क्रम ...
चंद्रपूर : स्वस्त धान्याचे नवीन इष्टांक पुरवठा विभागाने अद्याप मंजूर न केल्याने सन २०२०-२०२१ मधील नवीन कार्डधारकांना प्राधान्य क्रम नसलेल्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे रेशनकार्ड बनवून देखील त्यावर धान्य उपलब्ध नाही. यामुळे हे कार्ड केवळ नाममात्र ठरले आहेत. यामुळे गोरगरिबांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. सदर कार्डधारक वेळोवेळी तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करतात. त्यामुळे नवीन कार्डधारकांना प्राधान्य असलेल्या गटात समावेश करून धान्य द्यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली असून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
शिष्टमंडळात काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, शहर जिल्हा अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, सरपंच राजू पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती. निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाड, तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.