शिवभोजन केंद्रावर पुरवठा अधिकाऱ्यांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:00 AM2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:52+5:30
धाडीमध्ये त्यांना केंद्रामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. यामुळे अन्य शिवभोजन केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहे. या माध्यमातून गरीब तसेच गरजूंना ३ हजार ७०० थाळींचे मोफत वितरण केले जाते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाभार्थ्यांना भोजन वितरण न करता आपल्या सोयीनुसार केंद्रसंचालक लाभार्थ्यांना भोजन वितरण करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामधून पार्सलद्वारे वितरण, अस्वच्छता तसेच लाभार्थ्यांना जेवण करू देत नसल्याबाबतची बातमी ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी यांनी चंद्रपूर शहरातील काही शिवभोजन केंद्रावर धाड टाकत चौकशी केली.
विशेष म्हणजे, धाडीमध्ये त्यांना केंद्रामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. यामुळे अन्य शिवभोजन केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहे. या माध्यमातून गरीब तसेच गरजूंना ३ हजार ७०० थाळींचे मोफत वितरण केले जाते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाभार्थ्यांना भोजन वितरण न करता आपल्या सोयीनुसार केंद्रसंचालक लाभार्थ्यांना भोजन वितरण करीत आहे.
विशेष म्हणजे, प्लास्टिक पिशव्यांमध्ये जेवन भरून पार्सलद्वारे दिल्या जात आहे. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका होण्याची शक्यता आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांनी गंजवार्ड भाजी मार्केटमधील एक, सरकारी दवाखाना परिसरातील दोन, जटपुरा गेट परिसरातील एका केंद्रावर गुरुवारी सकाळी धाड टाकली. यावेळी केंद्रसंचालकांनी सावरासावर करीत अधिकाऱ्यांना उत्तरे दिली.
विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना अस्वच्छता तसेच काही ठिकाणी कचरा टाकण्यासाठी साधी डस्टबीनसुद्धा नसल्याचे दिसून आले. यावेळी स्वच्छता तसेच ठरवून दिलेल्या मानकानुसार भोजन देण्याच्या सूचना पुरवठा अधिकाऱ्यांनी केंद्र संचालकांना केल्या.