२७५ जणांना संजय गांधी निराधार योजनेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:43+5:302021-06-26T04:20:43+5:30
चंद्रपूर : गरीब, तसेच गरजूंना जगण्यासाठी आर्थिक लाभ मिळावा, यातून त्यांच्या गरजा भागाव्यात, या उद्देशाने शासनाने विविध योजना सुरू ...
चंद्रपूर : गरीब, तसेच गरजूंना जगण्यासाठी आर्थिक लाभ मिळावा, यातून त्यांच्या गरजा भागाव्यात, या उद्देशाने शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेकडो गरिबांना आधार मिळाला आहे. दरम्यान, चंद्रपूर तालुक्यातील संजय गांधी योजना समितीने आलेल्या प्रस्तावातील २७५ प्रकरणे मंजूर केले आहे. यामुळे कोरोना संकटाच्या काळात गरजू लाभार्थ्यांना आधार मिळाला आहे.
चंद्रपूर तहसील कार्यालयामध्ये नुकतीच संजय गांधी योजना समितीची बैठक पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष लहामगे, सदस्य अनु दहेगावकर, अरविंद मडावी, शरद मानकर, श्रीनिवास घोस्कुला, सूरज कन्नूर, नीरज बोंडे यांची उपस्थिती होती, तर प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार सचिन खंडाळे, नायब तहसीलदार राजू धांडे यांची उपस्थिती होती. यावेळी आलेल्या प्रस्तावाची पाहणी करून शासकीय निकशातील गरजूंची प्रकरणे मंजूर करण्यात आली.
बाॅक्स
असे आहे लाभार्थी
श्रावणबाळ योजना १६३
संजय गांधी निराधार योजना ८२
इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना १९
इंदिरा गांधी विधवा योजना ०९
इंदिरा गांधी दिव्यांग योजना ०२