सीएम चषक क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण खेळाडूंना पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:02 PM2018-12-07T23:02:51+5:302018-12-07T23:03:03+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थीे, युवक, युवतींना खेळाविषयीची आवड निर्माण व्हावी, याकरिता सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून बळ दिले जात आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. संजय धोटे यांनी केले. गोंडपिपरी येथे जनता विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या सीएम चषक स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थीे, युवक, युवतींना खेळाविषयीची आवड निर्माण व्हावी, याकरिता सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून बळ दिले जात आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. संजय धोटे यांनी केले. गोंडपिपरी येथे जनता विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या सीएम चषक स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खुशाल बोंडे, राजू घरोटे , सुरेश धोटे, बबन निकोडे, साईनाथ मास्टे, दीपक सातपुते, मनीष वासमवार नितीन ढुमने, वैष्णवी बोडलावार, कुसुम ढुमणे, स्वाती वडपलीवार चेतन गौर, संजय झाडे, दीपक बोनगीरवार, अश्विन कुसनाके, रवी पावडे उपस्थित होते.
पालकमंत्रीमुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी मिशन शौर्य अभियान सुरू केले. यातून आदिवासी विभागातील मुलांना एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी दहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या संधीचे सोने करत एव्हरेस्ट शिखर गाठण्यात यशस्वी झाले.
ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध करून देणे त्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिले तर महाराष्ट्र खेळात कुठेच कमी दिसणार नाही. खेळ हा जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. पराभव किंवा जिंकणे महत्त्वाचे नसून त्या खेळात सहभागी होणे महत्त्वाचे आहे, असे मत आमदार अॅड. धोटे यांनी व्यक्त केले.
गोंडपिपरी येथील सीएम चषक स्पर्धेत ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. विविध क्रीडा प्रकारात भाग घेऊन पुरस्कारासाठी पात्र ठरले. हॉलिबाल, रांगोळी, १०० मीटर दौड स्पर्धा दौड व खो-खो या स्पर्धेत स्पर्धकांमध्ये जोरदार लढत झाली. यावेळी खेळाडू व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.