सुरेशकुमार भगत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत महाराष्ट्रातून प्रथम
By admin | Published: April 25, 2017 12:29 AM2017-04-25T00:29:41+5:302017-04-25T00:29:41+5:30
आयुध निर्माणी विद्यालय भद्रावती येथे पीजीटी म्हणून कार्यरत सुरेशकुमार भगत यांनी ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करुन नवा किर्तीमान रचला आहे.
भद्रावती : आयुध निर्माणी विद्यालय भद्रावती येथे पीजीटी म्हणून कार्यरत सुरेशकुमार भगत यांनी ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करुन नवा किर्तीमान रचला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
भारत सरकार तथा महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनात ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१६-१७ नानासाहेब महाडीक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ ता. वाळवा जि. सांगली येथे शुक्रवारला पार पडली.या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत एस. के. भगत यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती, माध्यमिक गट यातंर्गत आपली स्वनिर्मिती प्रतिकृती मोबाईल मॅथमॅटीकल लॅब सादर करुन प्रथम क्रमांक प्राप्त केला.
महाराष्ट्रातून प्रथम आल्याबद्दल त्यांना कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचा धनादेश देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यंकटेश शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे, नानासाहेब महाडिक, आ. शिवाजीराव नाईक, विज्ञान संस्था नागपूर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)