सर्जिकल स्ट्राईक जगाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:38 AM2018-10-01T00:38:41+5:302018-10-01T00:39:09+5:30

कुणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सीमेत घुसून आंतकवाद्यांचा नायनाट करु शकतो, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला दिला आहे.

Surgical Strike Warning to the World | सर्जिकल स्ट्राईक जगाला इशारा

सर्जिकल स्ट्राईक जगाला इशारा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कुणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सीमेत घुसून आंतकवाद्यांचा नायनाट करु शकतो, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला दिला आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात २९ सप्टेंबर, शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर व माजी सैनिक संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी अहीर म्हणाले, भारताच्या संयमीवृत्तीचे जबाबदार उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक पुढील अनेक काळ देशवासियांच्या लक्षात राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला गृहीत धरु नये. शांततावादी असणारा हा देश गरज पडल्यास सिमेमध्ये घुसून शत्रूवर प्रहार करण्याची हिंमत ठेवू शकतो. हा इशारा व त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली ही लष्करी कारवाई आहे, असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपिठावर यावेळी मंचावर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे, कॅप्टन सोहदा, शौर्यचक्र प्राप्त सुभेदार शंकर मेंगरे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ डांगे, जिल्हा सैनिक कल्याण संघटक व जनमाहिती अधिकारी (निवृत्त) सुभेदार मेजर दिनेशकुमार गोवारे, विजय राऊत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेशकुमार गोवारे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी गौरवाचा दिवस आहे. तर डॉ .महेशर रेड्डी यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये सहभागी होणे किती कष्टाचे असते, याची माहिती दिली. संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले.
विरमाता व विरपत्नीचा सत्कार
चंद्रपूरच्या भुमीतून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सुपूत्रांच्या विरमाता व विरपत्नींचा सत्कार केला. यावेळी व्यंकमा गोपाल भिमनपल्लीवार, छाया बालकृष्ण नवले, पार्वती वसंतराव डाहुले, सुभेदार गणपती मेंगरे या वीरमाता, वीरपत्नी व शौर्यचक्र प्राप्त सैनिकांचे सत्कार करण्यात आला.

Web Title: Surgical Strike Warning to the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.