भूखंड अस्वच्छ ठेवणे मालकांना भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:44+5:302021-08-27T04:30:44+5:30

चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. त्यावर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा टाकतात. या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी होत ...

Surrounding the owners to keep the plot untidy | भूखंड अस्वच्छ ठेवणे मालकांना भोवले

भूखंड अस्वच्छ ठेवणे मालकांना भोवले

googlenewsNext

चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. त्यावर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा टाकतात. या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. अशा खुल्या भूखंडधारकांना नोटीस बजावून महानगरपालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील सातजणांवर प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारण्यात आला.

शहरातील खुल्या भूखंडांवर होत असलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराई तसेच इतर आजार व साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी, प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी भूखंडधारकांवर कारवाई केली जात आहे. खुल्या भूखंडावर मोठी झाडे, झुडपे, सांडपाणी जमा असलेल्या भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्या. त्यानुसार २५ ऑगस्टला कारवाई करण्यात आली.

बाॅक्स

भूखंडाचा होणार लिलाव

पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित खुल्या भूखंडाच्या मालकांनी सफाई करून सुरक्षा भिंत निर्माण करावी. आपल्या नावासह इतर तपशील असलेला फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्यथा खुल्या भूखंडावर सफाई शुल्काचे १० पट दंड स्वरुपात आकारणी करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी मनपाचे नावाने फलक लावण्यात येईल व भूखंड लिलावाची प्रक्रियासुद्धा करण्यात येईल, अशी तंबी मनपाने दिली आहे.

बाॅक्स

यांच्यावर झाली कारवाई

झोन एक (अ) मधील वडगाव येथील रामकृष्ण मंगरूळकर, झोन क्रमांक १ मधील तुकूम प्रभाग १ निर्माणनगरमधील लक्ष्मण गुजरकर, राम गुजरकर झोन २ (ब) मधील गुरुदेव चौक, लालपेठ, बाबूपेठ येथील राजू शामराव अमृतकर, झोन क्र. ३ (अ) येथे पोस्टल कॉलोनी, विठोबानगर, शास्त्रीनगर प्रभाग क्र.०२ येथील किशोर आमगांवकर, बापूजीनगर विठ्ठल मंदिर प्रभाग येथील कविता पाटील, बाबूपेठ १३ मधील गणेश एजंसी प्लॉट येथील अशोक कुपलवार यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारण्यात आला.

बाॅक्स

शहर अस्वच्छतेचे काय ?

महापालिकेने मोकळ्या भुखंड मालकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, शहरातील काही वाॅर्डामध्ये अस्वच्छता आहे. नाल्या, रस्ते नाही. सध्या पावसाचे दिवस आहे. अशावेळी रस्त्यांवर खोल खड्डे पडले असून सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे खुल्या भूखंड मालकांवर कारवाई केली त्याचप्रमाणे महापालिका पदाधिकारी, प्रशासनाने शहरातील इतरही समस्यांकडे लक्ष देऊन शहर नीटनेटके करणे गरजेचे आहे.

Web Title: Surrounding the owners to keep the plot untidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.