जागतिक बँकेच्या चमूकडून जलस्वराज्य प्रकल्पाची पाहणी
By admin | Published: January 26, 2017 01:22 AM2017-01-26T01:22:02+5:302017-01-26T01:22:02+5:30
जिल्ह्यातील जलस्वराज्य-२ कार्यक्रमाअंतर्गत निवडलेल्या निमशहरी व पाणी गुणवत्ता बाधीत गावांना जागतीक
एकार्जुना व नांद्रा गावाला भेट : योजना शास्वत राहण्याकरिता प्रयत्न करा!
चंद्रपूर : जिल्ह्यातील जलस्वराज्य-२ कार्यक्रमाअंतर्गत निवडलेल्या निमशहरी व पाणी गुणवत्ता बाधीत गावांना जागतीक बँकेच्या चमुने बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी चमुने गावकऱ्यांशी चर्चा करून योजना शास्वत राहण्याकरिता ग्रामस्थांनी प्रयत्न करावे, असे सांगितले.
या चमुमध्ये जागतिक बँकेचे सल्लागार मूर्ती, चमू प्रमुख एस. एन. राघवा, निर्मला चोप्रा, सुजेना, जलस्वराज्य-२चे प्रकल्प संचालक पी.डी. देशमुख, जल भुवैज्ञानीक वासो, राहुल ब्राम्हणकर, महाराष्ट जीवन प्राधीकरणचे अधीक्षक अभीयंता जगतारे, वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहीते, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी.सी. पिपरे, वरिष्ठ भुवैज्ञानिक विश्वास वालदे, कनिष्ठ भुवैज्ञानिक लांजेवार, महाराष्ट्र जिवन प्राधीकरणचे शाखा अभीयंता भालाधरे, कनिष्ठ अभियंता बाराहाते आदी उपस्थित होते.
जागतिक बँकेच्या चमुने प्रथम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह यांच्यासोबत जनपथ सभागृहात जलस्वराज्य-२ कार्यक्रमासंदर्भात चर्चा केली. यावेळी अडचणी समजून घेतल्या व संबधीतांना काही सुचना करीत हा प्रकल्प लोकहिताचा असून लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्याच्या सुचना केल्या.
यावेळी चमूने जिल्ह्यातील साखरवाही येथे भेट देऊन शासनातर्फे बसविण्यात आलेल्या पाणी शुध्दीकरण यंत्राची पाहणी केली. त्यानंतर जलस्वराज्य-२ अंतर्गत वरोरा तालुक्यातील पेरीअर्बन एकाजुर्ना व पाणी गुणवत्ता बाधीत नांद्रा ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पारंपारीक पध्दतीने स्वागत केले. या ग्रामपंचायतीमध्ये जलस्वराज्य-२ प्रस्तावीत योजनेची माहिती घेत, योजना काय आहे, हे जाणून घेतले.
त्यानंतर भद्रावती तालुक्यातील स्वच्छ भारत मिशन मधील नागलून या गावाची पाहणी केली. कार्यक्रमाला सरपंच, सचीव, समित्यांचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जलस्वराज्य-२ चे माहीती शिक्षण व संवाद तज्ञ प्रविण खंडारे, अभियांत्रीकी तज्ञ रोहन बालमवार, पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभीयंता स्नेहा रॉय, कृष्णकांत खानझोडे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)
नांद्रा येथील गावकऱ्यांशी चर्चा
योजना ही कशी राहणार आहे, या बाबत नांद्रा ग्रामस्थांशी चर्चा केली. नांद्रा व साखरवाही या दोन्ही गावांमध्ये पाणी दूषित असून त्याबाबत उपाययोजना म्हणून जलस्वराज्य-२ च्या माध्यमातून योजना देण्यात येत आहेत, हे ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले. ही योजना शास्वत सुरु राहावी, याकरिता ग्रामस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहन राघवा यांनी केले. तसेच या योजनेकडे आपली योजना म्हणुन पहा व चांगल्या तऱ्हेने चालवा, ही योजना लोकसहभागावर आधारीत असून कालांतराने ही योजना आपल्यालाच चालवायची आहे, असे चमूने सांगितले.