येरगव्हाण-देवाडा रस्त्यावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:24+5:302021-08-17T04:33:24+5:30

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते खराब ...

Survival pits on Yergavan-Devada road | येरगव्हाण-देवाडा रस्त्यावर जीवघेणे खड्डे

येरगव्हाण-देवाडा रस्त्यावर जीवघेणे खड्डे

Next

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते खराब झाले आहेत. या भागातील बहुतांश कुटुंबे तेलगू भाषक असल्याने तेलंगणा प्रदेशाशी जास्त संबंध असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील कोरपना, जिवती व राजुरा तालुक्यातील भेंडवी, कावळगोंदी, येरगव्हाण, उमरझरा, देवापूर, काकळघाट, भुरकुंडा, सुकडपल्ली, मोरलीगुडा, गेरेगुडा, सिद्धेश्वर आदी गावे येतात. या मार्गावरून जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे दुचाकी, चारचाकी बस वेळेवर पोहोचत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

160821\img_20210718_125630.jpg

येरगव्हाण देवाडा रस्त्याचे फोटो

Web Title: Survival pits on Yergavan-Devada road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.