पुरावे नष्ट करण्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:36+5:302021-06-16T04:37:36+5:30
पुरावे नष्ट करण्याचा संशय; काँग्रेस नगरसेवकांची एसीबीकडे तक्रार लेखापरीक्षण अहवालात २०० कोटींची अनियमितता आणि ७१ लेखांवर आक्षेप घेण्यात आला. ...
पुरावे नष्ट करण्याचा संशय; काँग्रेस नगरसेवकांची एसीबीकडे तक्रार
लेखापरीक्षण अहवालात २०० कोटींची अनियमितता आणि ७१ लेखांवर आक्षेप घेण्यात आला. पदाचा दुरुपयोग करून संबंधित कागदपत्रे पुरावे नष्ट केल्या जाऊ शकते. त्यामुळे संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन दोषींवर करावी, अशी तक्रार माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सुनीता लोढिया व नगरसेवक नंदू नागरकर यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. अनियमितता क्र. १ ते १५, कलम अ खालील आक्षेप क्र. १ ते २२, कलम ९ खालील २३ ते ५१, कलम ड खालील ५२ ते ७१ वरील आक्षेप घेतलेल्या विषयावर न्यायालयीन चौकशी करून दोषींकडून रक्कम वसुली व गुन्हा दाखल करण्याचे निवेदन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठविल्याचे समजते.