प्रेयसीच्या घरी प्रियकराचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:31 AM2018-03-12T04:31:10+5:302018-03-12T04:31:10+5:30
प्रियकराचा प्रेयसीच्याच घरी गळफास लावलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी मृतदेह आढळला. मात्र यात घातपात झाल्याचा आरोप प्रियकराच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे वाहन रोखून जोपर्यंत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणार नाही...
बाखर्डी (चंद्रपूर) : प्रियकराचा प्रेयसीच्याच घरी गळफास लावलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी मृतदेह आढळला. मात्र यात घातपात झाल्याचा आरोप प्रियकराच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे वाहन रोखून जोपर्यंत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणार नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुल्लया देवराव परचाके असे मृताचे नाव आहे. तो कोरपना तालुक्यातील कवठाळा ग्रामपंचायतीत संगणक परिचालक म्हणून काम करत होता. रविवारी सकाळी ७ वाजता पोलिओ लसीकरण असल्याने पुल्लया परचाके यांनी पोस्टर लावले. नंतर तो त्याच कवठाळा येथील आपल्या प्रेयसीच्या घरी गेला. सकाळी मुलीचे आई-वडील शेतात गेले होते. दरम्यान, पुल्लयाचे आपल्या प्रेयसीसोबत काही कारणास्तव भांडण झाले. त्यामुळे ती तेथून पळाली व आपल्या चुलत भावाच्या घरी गेली. यावेळी पुल्लया प्रेयसीच्याच घरी होता. मुलीचा भाऊ तिथे पोहोचला असता त्याला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत पुल्लयाचा मृतदेह आढळून आला. तो जिवंत असेल, असे समजून मुलीच्या भावाने त्याला फासातून बाहेर काढले आणि डॉक्टरांना माहिती दिली. मात्र डॉक्टरांनी पुल्लयाला मृत घोषित केले.