बीआरटीसीला शाश्वत बांधकाम, तंत्रज्ञान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:01 AM2019-12-22T01:01:40+5:302019-12-22T01:02:36+5:30

ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे व परंपरेने चालत आलेला व्यवसाय, हस्तकौशल्याला विशिष्ट ओळख मिळावी. आर्थिक विकास करून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने, बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी सुरू आहे. बांबूचा मूल्यवर्धित उपयोग वाढवण्याकरिता नवीन बांबू धोरण जाहीर करून जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने ४ डिसेंबर रोजी घेतला.

Sustainable Construction, Technology Award to BRTC | बीआरटीसीला शाश्वत बांधकाम, तंत्रज्ञान पुरस्कार

बीआरटीसीला शाश्वत बांधकाम, तंत्रज्ञान पुरस्कार

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । प्रकल्प संचालक राहुल पाटील यांनी दिल्ली येथे स्वीकारला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिल्ली येथील ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबीटट असेमेंट परिषदद्वारे १६ ते १८ डिसेंबर दरम्यान संमेलनात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली प्रकल्पास शाश्वत बांधकाम साहित्य व तंत्रज्ञान या श्रेणीतील हरित बांधकाम मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे संचालक राहुल पाटील यांनी स्वीकारला.
ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबीटट असेमेंट परिषद भारतातील हरित बांधकाम संबंधाने पर्यावरण अनुकूल शाश्वत साहित्याचा वापर व वैशिष्ट्यपूर्ण रचना इत्यादी बाबींचे मूल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड केली जाते.
ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे व परंपरेने चालत आलेला व्यवसाय, हस्तकौशल्याला विशिष्ट ओळख मिळावी. आर्थिक विकास करून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने, बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी सुरू आहे. बांबूचा मूल्यवर्धित उपयोग वाढवण्याकरिता नवीन बांबू धोरण जाहीर करून जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने ४ डिसेंबर रोजी घेतला. त्यानुसार प्रकल्पाचे बांधकाम नियोजितस्थळी चिचपल्ली येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू प्रभावीपणे सुरू आहे.

बांबूची इमारत अंतिम टप्प्यात
चिचपल्ली बांबू प्रकल्पाच्या मुख्य इमारती या बांबूचा वापर करून बांधण्यात आलेल्या आहेत. भिंतीचे बांधकाम विटा, सिमेंट, काँक्रिट ऐवजी माती, रेती व अत्यल्प प्रमाणात सिमेंट वापरून या प्रकारचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे इमारतीत तापमान नियंत्रित राहुन वातावरण अल्हाददायक राहील. भिती रंगरंगोटी न करता नैसर्गीक अवस्थेत राखण्यात आलेल्या आहेत.

जगभरातील तज्ज्ञांकडून प्रशंसा
पुरस्कार वितरण कार्यक्रम इंडिया हॅबिटट सेंटर, न्यू दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी अध्यक्ष ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबीटट असेमेंट परिषद तथा महासंचालक दि एनर्जी अ‍ॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्युटचे डॉ. अजय माथूर, युएनएसडब्ल्यु फॅकल्टी आॅफ ब्युल्ट इन्व्हायरमेंट सिडने आस्ट्रेलियाचे प्रा. हेलेन लॉकहेड, फ्रेडी स्वाने रॉयल डेनिशचे भारतातील राजदूत दुर्ग शंकर मिश्रा, सदस्य (एचआर) एएआय अनुज अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबीटट असेमेंट परिषद व वरिष्ठ संचालक एनर्जी अ‍ॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्युटचे संजय सेठ आदी उपस्थित होते. त्यांनी बांबू प्रकल्पातील उपक्रमांची प्रशंसा केली.

Web Title: Sustainable Construction, Technology Award to BRTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.