पाईप लाईनचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:35 PM2018-07-26T23:35:12+5:302018-07-26T23:35:34+5:30

चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जुनी, खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन बदलविण्याची मागणी वारंवार करण्यात आली. चक्क जीवन प्राधिकरणनेही ही पाईप लाईन बदलविण्याचा अनेक वर्षांपूर्वी अहवाल दिला होता.

Sutenona eclipsed the pipe line | पाईप लाईनचे ग्रहण सुटेना

पाईप लाईनचे ग्रहण सुटेना

Next
ठळक मुद्देखिळखिळी पाईपलाईन धोकादायक : अनेक ठिकाणी लिकेज, दूषित पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जुनी, खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन बदलविण्याची मागणी वारंवार करण्यात आली. चक्क जीवन प्राधिकरणनेही ही पाईप लाईन बदलविण्याचा अनेक वर्षांपूर्वी अहवाल दिला होता. मात्र चंद्रपूरकरांना खिळखिळ्या पाईप लाईनच्या स्वरुपात लागलेले ग्रहण अद्याप कायमच आहे. मनपा झाल्यानंतर अनेकदा निधी येत गेला, खर्चही होत गेला. अमृत योजनेचेही काम सुरू आहे. मात्र अद्यापही चंद्रपूरकरांना जीर्ण पाईपलाईनमधून येणारे पाणीच प्यावे लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणच्या लिकेजमधून दूषित पाणी पुरवठाही होत आहे.
३० ते ३५ वर्षांपूर्वी नगरपालिका अस्तित्वात असताना शहरात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली. साधारणत: या पाईप लाईनची वयोमर्यादा १७ वर्ष असते. १७ वर्ष झाले की ती पाईप लाईन कालबाह्य झाली, असे समजण्यात येते. मात्र चंद्रपुरात अद्याप याच पाईप लाईनमधून पाणी पुरवठा होत आहे. ही पाईप लाईन ३५ ते ४० वर्ष जुनी झाली असल्याने खिळखिळी झाली आहे. अनेक ठिकाणी पाहिजे तसा पाण्याचा फोर्स येत नाही. याशिवाय ही पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेज होऊन नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो. अनेक ठिकाणी पाण्याची गळतीही सुरू असते. त्यामुळे ही पाईप लाईन बदलवून नवी पाईप लाईन टाकण्यात यावी, अशी नागरिकांनी वारंवार मागणी केली. मात्र या मागणीकडे गांभीर्याने बघण्यात आले नाही. दरम्यान, मध्यंतरी जीवन प्राधिकरण विभागानेही ही पाईप लाईन कालबाह्य झाली असल्याने बदलविण्याबाबतचा अहवाल तत्कालीन नगरपालिकेला दिला होता. नगरपालिका असताना ही पाईपलाईन बदलविण्याबाबत विचारमंथनही झाले. मात्र माशी कुठे शिंकली, हे कळले नाही. चंद्रपूर शहराच्या पंचशताब्दी वर्षानिििमत्त चंद्रपूरच्या विकासासाठी राज्य शासनाने २५० कोटींचा निधी देऊ केला होता. यातील पहिला हप्ता म्हणून २५ कोटी रुपये मनपाला प्राप्तही झाले होते. या निधीतून जुनी पाईप लाईन बदलविण्याचाही विचार मनपाने केला होता. नवीन ठिकाणी पाईप लाईन टाकण्यासाठी दोन कोटी व जुन्या पाईप लाईन बदलविण्यासाठी सहा कोटींची तरतूद करणारा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्तावदेखील मध्येच गुंडाळला.
मनपा झाली; तरीही पाईपलाईन तीच
चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. मनपाचे उत्पन्नही वाढले आहे. वरवरचे शहर चकाचक करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र जमिनीच्या खालील पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन बदलविण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे ही समस्या सुटू शकली नाही.
सिव्हरेज योजनेमुळे पाईपलाईन फुटण्याची भीती
सिव्हरेज योजनेचे बंद पडलेले काम पुन्हा महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी काही भागातील रस्ते पुन्हा फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच रामनगर मार्गावर सिव्हरेजच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. या खोदकामामुळे आधीच जीर्ण झालेली पाणी पुरवठ्याची पाईप लाईन फुटण्याची शक्यता अधिक आहे.
लिकेजमुळे पाणी दूषित
पाणी वितरण व्यवस्थेतील पाईपलाईन कालबाह्य व खिळखिळी झाली आहे. या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेजेस आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. रस्त्यावर चिखल, नाल्या तुंबलेल्या आहेत. हे चिखलयुक्त पाणी लिकेजमधून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये जाऊन अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. जवळजवळ प्रत्येक नळाला आधी अर्धा तास लालसर दूषित पाणी येत असल्याचे दिसते.

Web Title: Sutenona eclipsed the pipe line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.