हायटेक फार्मसी कॉलेजचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:44+5:302021-09-05T04:31:44+5:30
चंद्रपूर : स्थानिक हायटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने जुलै २०२१ मध्ये ऑनलाईन पद्धतीने ...
चंद्रपूर : स्थानिक हायटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने जुलै २०२१ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या डी. फार्म व बी. फार्मच्या उन्हाळी परीक्षा २०२१ मध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा बी फार्म प्रथम व अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के, द्वितीय वर्षाचा निकाल ९९ टक्के तर डी फार्म प्रथम वर्षाचा निकाल ९४ टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. बी फार्म अंतिम वर्षातील मृनाल दिलीप राऊत ९.५३ सीजीपीए, तृतीय वर्षातील सोनाली वामन भोयर १० सीजीपीए, द्वितीय वर्षातील शुभम भाऊराव डोंगरे ९.८६ एसजीपीए घेऊन उत्तीर्ण झाले तर डी. फार्म प्रथम वर्षातील सलोनी राजपुतने ९३.१८ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. लभेश डिंमदेव चरडे ८९.३६ द्वितीय, अंकिता एकोणकर ८६.८२ तृतीय तर डी. फार्म द्वितीय वर्षातील रितिक चेंडे ९३.३० टक्के घेऊन प्रथम क्रमांक तर साक्षी सुरेश वांढरे ९३.१० द्वितीय, धरती संभा बोरकर ९१.५० टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रशांत मोरे, प्राचार्य डॉ. सतीश कोसलगे, डॉ. सुशील बुरले, डॉ. पंकज पिंपळशेंडे, डॉ. वशिम शेख तसेच सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.