स्वाब नेचर केअर संस्थेने केला नलेश्वर मोहाडी तलाव परिसर स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:38+5:302021-09-02T04:59:38+5:30
पावसाळा सुरू झाला आणि धकाधकीच्या जीवनातून थोडेफार वेळ मिळाला की लोक निसर्ग, निसर्गातील पर्यटनस्थळे, डोंगर, तलाव, धबधब्यांवर ...
पावसाळा सुरू झाला आणि धकाधकीच्या जीवनातून थोडेफार वेळ मिळाला की लोक निसर्ग, निसर्गातील पर्यटनस्थळे, डोंगर, तलाव, धबधब्यांवर सहपरिवार आणि मित्र-मैत्रिणींसोबत भटकंती करायला जातात. काहीजण निष्काळजी व मूर्खपणामुळे त्या परिसराचा विनाश करायलाही मागे-पुढे पाहत नाही. परिसर प्रदूषित करत असतात. यामध्ये सुशिक्षित, उच्चभ्रू पर्यटक दारूच्या बाटल्या व प्लास्टिक कचरा तिथेच टाकून जातात. याच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये, काचांच्या बाटल्यांमध्ये अडकून पक्षी, सरपटणारे प्राणी आपला जीव गमावतात. प्लास्टिक पडलेल्या जागेवर बियाणेही उगवत नाही त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असते. या अनुषंगाने स्वाब नेचर केअर संस्थेने स्वच्छता अभियान अंतर्गत नलेश्वर मोहाडी तलाव परिसर प्लास्टिक कचरामुक्त केला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कायरकर, सदस्य सचिन निकुरे, विकास बोरकर, हितेश मुंगमोडे, वेदप्रकाश मेश्राम, महेश बोरकर, प्रतिकार बोरकर, प्रशांत सहारे, श्रेयस कायरकर, साहील सेलोकर यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
310821\img-20210830-wa0145.jpg
कचरा जमा करताना स्वाब नेचर केअर संस्थाचे कार्यकर्ते