स्‍वातंत्र्यवीर सावरकर विचारांचे ऊर्जापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:15+5:302021-05-29T04:22:15+5:30

चंद्रपूर : स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या कार्याची व विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. अंदमानच्‍या अंधार कोठडीत असताना स्‍वातंत्र्याच्‍या विचारांचा ...

Swatantryaveer Savarkar The powerhouse of thought | स्‍वातंत्र्यवीर सावरकर विचारांचे ऊर्जापीठ

स्‍वातंत्र्यवीर सावरकर विचारांचे ऊर्जापीठ

Next

चंद्रपूर : स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या कार्याची व विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. अंदमानच्‍या अंधार कोठडीत असताना स्‍वातंत्र्याच्‍या विचारांचा सूर्य त्‍यांनी कायम तळपत ठेवला. भारतमातेच्‍या स्‍वातंत्र्यासाठी त्‍यांनी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत लढा दिला. त्यांच्या देशभक्तीपर विचारांचा अंगीकार करणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या १३८ व्‍या जयंतीनिमित्त ते बोलत होते.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर भारतदेशासाठी कायमच विचारांचे ऊर्जापीठ राहणार आहे. दारिद्र्य निर्मूलन व विषमता नष्‍ट करण्‍यासाठी त्‍यांच्‍या विचारांची आपल्‍याला सदैव गरज आहे, असेही ते म्‍हणाले. यावेळी प्रामुख्‍याने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, ॲड. सुरेश तालवार, राजकुमार आकापेल्‍लीवार यांची उपस्थिती होती.

Web Title: Swatantryaveer Savarkar The powerhouse of thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.