स्वातीच्या पुढाकारातून भुकेलेल्यांसाठी ‘आधार तरुणांचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:19+5:302021-05-19T04:29:19+5:30

गोवरी : माणसाला पोटाची भूक स्वस्थ बसू देत नाही. कोरोनाकाळात पोटाची भूक भागविण्यासाठी नाईलाजाने कुणी पुढेही येत नव्हते. मात्र, ...

Swati's initiative 'Aadhar youth' for the hungry | स्वातीच्या पुढाकारातून भुकेलेल्यांसाठी ‘आधार तरुणांचा’

स्वातीच्या पुढाकारातून भुकेलेल्यांसाठी ‘आधार तरुणांचा’

Next

गोवरी : माणसाला पोटाची भूक स्वस्थ बसू देत नाही. कोरोनाकाळात पोटाची भूक भागविण्यासाठी नाईलाजाने कुणी पुढेही येत नव्हते. मात्र, आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त हेतूने समाजात काही अशीही सेवाभावी माणसे असतात. ती नेहमी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतात. कोरोनाकाळात जीव वाचविणे मुश्कील असताना तिने स्वतःच्या घरून कोरोनाबाधित रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना जेवणाचा डबा देऊन भुकेलेल्यांना आधार दिला आहे.

राजुरा येथील स्वाती ऋषी मेश्राम (२५) असे कोरोनाबाधितांसाठी देवदूत ठरलेल्या युवतीचे नाव आहे.

कोरोनाने केवळ राज्यातच-देशातच नव्हे तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना जेवणासाठी भटकंती करावी लागत आहे. अशावेळी रुग्णांची आणि नातेवाइकांची होणारी गैरसोय पाहून राजुरा येथील २५ वर्षांच्या स्वाती मेश्राम हिने कोरोना काळात कोणाचे काहीतरी चांगले व्हावे, या उद्दात हेतूने आपल्या संपर्कातील काही युवा मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप बनवला आणि या ग्रुपला ‘आधार तरुणांचा’ नाव देऊन यामध्ये सर्वांना जोडून घेतले. सुरुवातीला स्वतःहून स्वाती पुढे आली. कुणाकडूनही कसल्याही प्रकारची मदत न मागता स्वतःच्या घरून जसे जमेल तसे डब्बे पुरवीत होती. त्यानंतर आधार तरुणांचा ग्रुप तयार झाला. या सेवाभावी कार्यासाठी मित्राकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आणि सहकार्य मिळाले. बरेच लोक ‘आधार तरुणांचा’ या ग्रुपला सहकार्य करू लागले. आतापर्यंत आधार तरुणांचा या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना आणि नातेवाइकांना राजुरा परिसरात दोन वेळचे डबे मोफत पुरविले गेले आहेत आणि हे काम सातत्याने सुरू आहे. खरेतर आजच्या धावपळीच्या जगात कुणाकडेच वेळ नाही. तरुणांकडे आज समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आजचा तरुण सोशल मीडियामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही. तो सामाजिक जाणिवेपासून कोसोदूर गेलेला आहे. परंतु, सामाजिक बांधिलकी जोपासत स्वाती मेश्राम यांनी सुरू केलेला उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Swati's initiative 'Aadhar youth' for the hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.