भारतीय जैन संघटनेतर्फे शपथग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:31 PM2019-07-08T22:31:11+5:302019-07-08T22:31:28+5:30
येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम जैनभवनात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम जैनभवनात पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार पुगलिया, संदीप बांठीया, अमित पुगलिया, नितीन पुगलिया, जितेंद्र चोरडिया, मनीष भंडारी, अनिता गांधी, मोना खजांची, संतोष खजांची, संगीता डगली, निता कोठारी, सोनल पारेख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी भारतीय जैन संघटनेतर्फे आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या, शांतीसेवा मंडळाच्या सर्वेसर्वा तसेच भारतीय जैन संघटनेच्या माजी महिला अध्यक्षा शकुंतला बांठीया, जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी विदर्भ कार्यकारणी सदस्य अॅड. प्रशांत खजांची, भारतीय जैन संघटनेचे बॅन्ड अंबेसेडर, काश्मिर, किल्लारी, नेपालमध्ये सेवा देणारे दीपक पारेख, राष्ट्रीय रायकारणी सदस्य व स्मार्ट गर्ल प्रमुख प्रशिक्षक अमर गांधी, अशोक सिंघवी, भारतीय जैन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा आदींचा यावेळी शाल, श्रीफळ तसेच सन्मानपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी प्रफुल्ल पारेख यांनी पाणी, मुल्यशिक्षणावर मार्गदर्शन केले. यावेळी राज्यध्यक्ष हस्तीमल बंब यांनी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, युवा अध्यक्ष गौतम कोठारी, तसेच जिल्ह्यातील नवीन कार्यकारणी, तालुका कार्यकारणीच्या अध्यक्ष, सचिवांना शपथ दिली. याप्रसंगी माजी खासदार पुगलिया यांनी मार्गदर्शनात भारतीय जैन संघटनेने विदर्भात विशेष योगदान देण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष गौतम कोठारी, संचालन जिल्हा सचिव अॅड. इंदर पुगलिया, आभार शहर अध्यक्ष दीपेंद्र पारेख यांनी मानले. यावेळी सुरेंद्र खजांची, सुधीर बांठीया, रवींद्र बैद, रमेश कोठारी, राहूल पुगलिया, संदीप बांठीया, अमित पुगलिया, नितीन पुगलिया, जितेंद्र चोरडिया, मनीष भंडारी, अनिता गांधी, मोना खजांची, संतोष खजांची, संगीता डगली, निता कोठारी, सोनल पारेख आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल बोथरा, रोहित पुगलिया, निरज खजांची, जितेंद्र जोगाड, गौतम भंडारी, अनुप खाटोड, संजय पोद्दार, त्रिशुल बंब, विशाल मुथा, अॅड. रितेश संघवी, राजेश तालेरा, सिद्धार्थ कोठारी, स्वदेश गांधी आदींनी प्रयत्न केले.