तलवारी निघणे, गोळीबार होणे नित्याचे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:59+5:302021-06-01T04:21:59+5:30

बल्लारपूर : रविवारी वस्ती विभागात दोन युवकांनी एकाची भरचौकात तलवारीने गळा चिरून हत्या केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. आता ...

Swords and shootings became commonplace | तलवारी निघणे, गोळीबार होणे नित्याचे झाले

तलवारी निघणे, गोळीबार होणे नित्याचे झाले

Next

बल्लारपूर : रविवारी वस्ती विभागात दोन युवकांनी एकाची भरचौकात तलवारीने गळा चिरून हत्या केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. आता शहरात भरदिवसा तलवारी निघणे, बंदुकीने गोळीबार करणे या घटना बल्लारपुरात जणू नित्याच्याच झाल्या आहेत. बल्लारपुरात एकेकाळी गुन्हेगारी चांगलीच फोफावली होती. पुढे यावर आळा बसला. आता पुन्हा बल्लारपुरात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बल्लारपूर शहराची ओळख मिनी भारत म्हणून केली जाते व औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व अन्य राज्यांतील कामगार येथे वास्तव्यास आहेत. यामुळे ४० वर्षांपासूनच शहरात गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची मनमानी सुरू आहे. मध्यंतरी शहरातील गुन्हेगारी कमी झाली होती. परंतु आता पुन्हा गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसते. बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच खून झाले, तर चार वेळा खुनाचा प्रयत्न झाला. भगतसिंग वॉर्डात झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. सिद्धार्थ वॉर्डात भरदिवसा चार-पाच तरुणांनी एका निरपराध मुलास तलवारीने गंभीर जखमी केले तर गणपती वॉर्डात तलवारी घेऊन फिरणाऱ्या गुंडांना पोलिसांनी अटक केली. टेकडी विभागातही तलवार घेऊन फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. ८ ऑगस्ट २०२० ला भरदुपारी वर्दळीच्या मुख्य मार्गावर सुरज बहुरिया यांची हत्या युवकांनी गोळ्या झाडून केली. या रक्तरंजित थराराने बल्लारपूर शहर हादरले. यानंतर त्याच्या साथीदाराने काहींना तलवारीने धमकाविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय घटनेच्या ६ महिन्यांनंतर सुरज बहुरिया यांच्या दोन साथीदारांना देशी कट्टा घेऊन फिरताना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, रविवारी सायंकाळी पुन्हा तलवारीने गळा चिरून एकाची हत्या करण्यात आली. आतापर्यंत पोलिसांनी दहा तलवार जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

बॉक्स

कोळसा उद्योगामुळे गुन्हेगारी वाढली

शहरात गुन्हेगारी वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शहरातील एकेकाळी नावाजलेला कोळसा उद्योग आहे. या कोळसा उद्योगातील कोळसा चोरी, लोखंड चोरी, तसेच शहरातील दारू तस्करी करणारी वेगवेगळी टोळी आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी गुन्हे करतात.

बॉक्स

त्या तीन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

रविवारी राकेश बहुरिया यांच्यावर तलवारीने हल्ला करून खून करणाऱ्या राजकुमार राजू बहुरिया, शिवराज राजू बहुरिया या दोन्ही भावांसोबत त्यांची आई रूपा राजू बहुरिया या तिघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: Swords and shootings became commonplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.