ताडोबातील वनरक्षक, वनपाल एकस्तर वेतनापासून वंचित
By admin | Published: February 24, 2016 12:50 AM2016-02-24T00:50:51+5:302016-02-24T00:50:51+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ दिला जातो. मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ...
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ दिला जातो. मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आदिवासीबहुल व दुर्गम भागातील वनरक्षक, वनपाल मात्र एकस्तर वेतनापासून वंचित आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी. गरड व चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांची भेट घेऊन ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांना तातडीने एकस्तर वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
चंद्रपूर वनवृत्तातील नियत क्षेत्राची सीमा निश्चित नसल्यामुळे संरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना वनरक्षक व वनपालांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.. त्यामुळे सदर नियत क्षेत्राची सीमा निश्चिती करण्याचे काम वन सर्वेक्षकाद्वारे करण्यात यावे. सदर सीमा निश्चिती नसल्यामुळे वनरक्षक व वनपालांना कर्तव्य पार पाडताना कर्तव्यात कसूर असल्याचा दोषारोप करण्यात येऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासोबतच विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शिष्टमंडळात वनरक्षक व वनपाल संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल मंत्रिवार, सचिव भारत मडावी, शंकर देठेकर, विदेश गलगट, बी.के.तुपे, पी.एस. झाडे, व्ही.एच. राखुंडे, डी.एल. उमरे, ए.बी.गेडाम, एन.आर. चाफले, आय.आर. फारूखी, सुरेश मांदाडे, अजय तिजारे, प्रवीण बोबाटे, डी.एम. चौधरी, मनोज वानखेडे, मनीष निमकर, विजय मोरे, मारोती पुल्लेवार, उज्ज्वला मडावी, सपना मोडक, पूजा महाजन, टीना काळे, सुमेद शिंदे, सुनिल गाजलवार, महादेव जाधव, प्रदीप बोरकर, जितेंद्र वैद्य, कल्याणी रणदिवे, लता गावंडे, वैशाली चिडे व अन्य संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
(प्रतिनिधी)