ताडोबा जंगल म्हणजे ‘लयच भारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:09 AM2018-01-15T00:09:58+5:302018-01-15T00:11:10+5:30
मुंबईपासून चंद्रपूर, बल्लारपूर, भंडारा असा अनेकदा प्रवास केला. नागझीरा, नवेगांव (बांध) यासह महाराष्ट्रातील किल्ले, शिखर या ठिकाणावर आधारित दहा ते बारा पुस्तकांचे लिखाण केले आहे.
राजकुमार चुनारकर ।
आॅनलाईन लोकमत
चिमूर : मुंबईपासून चंद्रपूर, बल्लारपूर, भंडारा असा अनेकदा प्रवास केला. नागझीरा, नवेगांव (बांध) यासह महाराष्ट्रातील किल्ले, शिखर या ठिकाणावर आधारित दहा ते बारा पुस्तकांचे लिखाण केले आहे. मला जे दिसते, ते टिपतो व लिहितो. मी एक टॅव्हलर असल्यामुळे माझी भटकंती अशीच चालू राहील. दुसºयांदा ताडोबाला वाघ बघायला आलो. ताडोबाचे जंगल म्हणजे लयच भारी, असे गौरवोदगार हिन्दी,मराठी चित्रपट कलावंत मिलींद गुणाजी यांनी काढले.
शनिवार व रविवार सलग दोन दिवस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी ते चिमूर तालुक्यातील नवेगाव गेटवर आले असताना लोकमतने सिनेअभिनेता मिलींद गुणाजी यांच्यासोबत दिलखुलास संवाद साधला.
शासनाचे माजी वाईल्ड लाईफ व अॅडव्हेन्चरचे ब्रॅन्ड अॅम्बासीडर असल्याने वाघाच्या होणाºया मृत्यूबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, वाघाच्या संवर्धनासाठी वनविभाग प्रयत्न करेलच. मी ताडोबाला वाघ बघायला आलो आहे. दोन दिवसांच्या सफारीमध्ये अनेक प्राणी बघितले. मात्र वाघराजा दिसला नाही. मात्र हे जंगल पाहूनच मी कमालीचा मोहित झाला आहे. हे जंगल आणि वाघ बघायला पुन्हा ताडोबाला येणार आहे. आतापर्यंत पपिहा, कामसुत्र, फरेब, देवदास, जोर, विरासत, सलमा पे दिल आ गया, या चित्रपटासह हिन्दी, मराठी अशा २५० चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आव्हानात्मक वगैरे असा काही विषय राहिला नाही. सतत काम करण्याची आता माझी इच्छा नाही. त्यामुळे एखादी ‘ग्रेट’ भूमिका आली तरच करणार, असेही गुणाजी म्हणाले. एका कापडाच्या मॉडेलिंगपासून सुरु झालेल्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. त्या संघर्षाने सोडविल्या आणि पुढे जात राहिलो. या क्षेत्रात सतत काम करीत राहावे लागते. नवीन कलावंतांनी मनापासून काम करीत रहावे, यश आपोआपच पदरात पडते, असा सल्लाही त्यांनी न्यू कमर्सना दिला.