ताडोबा आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:47 AM2019-07-20T00:47:30+5:302019-07-20T00:48:01+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते.

Tadoba The pilgrim center of modern India | ताडोबा आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र

ताडोबा आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र

Next
ठळक मुद्देसिंधुताई सपकाळ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पहिल्यांदा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते. हमखास व्याघ्र दर्शनासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आधुनिक जगातील निसर्ग तीर्थक्षेत्र होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केले.
वृक्षदिंडी आणि स्वच्छता महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी माई आल्यावर त्यांनी पहिल्यांदा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना सिंधुताई म्हणाल्या, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारताचे भूषण आणि संपूर्ण जगाचे वैभव आहे. ताडोबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प आहे. येथे असलेली वाघांची संख्याही इतरत्र असलेल्या प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला वाघाचे दर्शन हे हमखास लाभतेच. दरवर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक ताडोबाला येतात. ही बाब महत्त्वाची वाटते.
कारण गोरगरीब तरुणांना, स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळतो, त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. ताडोबामध्ये वाघ पहायला येणाºया पर्यटकांनी उच्छाद मांडू नये, आरडाओरड करू नये, गोंधळ घालू नये, आपल्या कृतीतून वाघ किंवा इतर कुठल्याही वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला किंवा वनसंपदेला, जैवविविधतेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी, अस आवाहन सिंधुतार्इंनी पर्यटकांना उद्देशून केले. पर्यटकांना निसर्गाचे महत्त्व कळावे आणि पर्यटनाबरोबच नैसर्गिक सौदर्य अबाधीत रहावे, पर्यटकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, पर्यटकांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने अधिक जनजागृती करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोल बैस, शैलेंद्र बैस, ममता बालसदन पुणेचे व्यवस्थापक दीपक गायकवाड उपस्थित होते.
मुनगंटीवारांमुळे वनविभागाला मिळाली ओळख
राज्याचे कर्तबगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा वन विभागाला ओळख दिली आहे, वन विभागाचे कार्य लोकाभिमुख झाले. त्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी साडेचार वर्षात जीव ओतून काम केले आहे. ही बाब महत्त्वपूर्ण असून असा वनमंत्री होणे नाही, या शब्दात सिंधुतार्इंनी वनमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केली. वाघांचे रक्षण करताना गोमातेला विसरू नका. तिला आपल्या काळजात जागा दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
वाघोबांची पूजा करणारा माझा भारत
आजवर मी जगभरातील जवळपास २२ देशात फिरून आले आहे. देवळातले देव मी खूप पाहिले. पण आज जंगलातला देव पहिल्यांदा बघितला. उभ्या आयुष्यात प्रथमच मी ताडोबाला भेट दिली. तेव्हा मला इथे अनेक ठिकाणी वाघोबाचे मंदिर दिसले, वाघोबाला ताडोबातील स्थानिक लोक निसर्गदेवता मानून पूजा करतात. ही बाब मला अधिक आवडली आहे. कारण आतापर्यंत लोक स्वत:हून वाघोबांची पूजा करतात हे माहित नव्हत. हे फक्त ताडोबाला आल्यावर दिसले. येथील लोक वाघांना मारत नाहीत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करतात, म्हणून बाबांनो वाघोबांची पूजा करणारा माझा भारत देश महानच आहे, असेही सिंधुताई सपकाळ म्हणाल्या.

Web Title: Tadoba The pilgrim center of modern India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.