पर्यटनात ताडोबा प्रकल्पाची भरारी; अन्य देखण्या स्थळांची उपेक्षाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 02:44 PM2024-09-27T14:44:07+5:302024-09-27T14:44:34+5:30

पर्यटन विकासाची वाढावी व्याप्ती : ऐतिहासिक, सांस्कृतिक, कृषी व ग्रामीण पर्यटनाला द्यावा बूस्टर

Tadoba project boom in tourism; Ignore other beautiful places! | पर्यटनात ताडोबा प्रकल्पाची भरारी; अन्य देखण्या स्थळांची उपेक्षाच !

Tadoba project boom in tourism; Ignore other beautiful places!

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने यंदाही पर्यटन क्षेत्रात मोठी भरारी घेतली. देशी व विदेशी पर्यटकांची संख्या वाढतच आहे. मात्र, जिल्ह्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, कृषी व ग्रामीण पर्यटनाला चालणारे, देणारे देखणे स्थळ तुलनात्मकदृष्ट्या उपेक्षित राहिले. त्यामुळे रोजगाराभिमुख पर्यटन विकासाची व्याप्ती वाढविण्यासाठी या क्षेत्रांनाही बूस्टर देण्याची गरज निर्माण झाली आहे.


ताडोबा व्याघ्घ्र प्रकल्पाची महती देशभरात पोहोचली. देशी व विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात सफारीसाठी येत असल्याने ताडोबा व्यवस्थापनाला चांगला महसूलही मिळत आहे. अर्थबळ मिळाल्याने ताडोबा क्षेत्रात पर्यटकांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविले जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य, कृषीवर आधार ग्रामजीवन, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले व सांस्कृतिक समृद्धी असताना या क्षेत्रांचा पर्यटन पोर्टफोलिओ विस्तार करण्याचीही नितांत आवश्यकता आहे. ग्रामीण पर्यटन, खेड्यातील कृषी जीवनशैली, ऐतिहासिक स्थळे व कलाकुसर यावर आधारित पर्यटनाशी निगडित नवे उपक्रम सुरू करण्याची संधी आहे. असे झाल्यास ग्रामीण आर्थिक विकासात भर पडून रोजगारालाही काही प्रमाणात चालना मिळू शकते. त्यासाठी जिल्हा पर्यटन विकास धोरणात या बाबींचा समावेश करून बूस्टर देण्यासाठी गरज. 


ही आहेत महत्त्वाची पर्यटन स्थळे
भद्रावती जैन मंदिर, महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, गोंडकालीन किल्ला, परकोट, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, विजासन हिल्स, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, घोडाझरी वन्यजीव अभयारण्य, वढा, मोहुर्ली बटर प्लाय गार्डन, बल्लारपूर बॉटनिकल गार्डन, प्रेरणाभूमी आनंदवन आश्रम वरोरा, अड्याळटेकडी, सोमनाथ मूल, रामदेगी, चिमूर येथील बालाजी मंदिर. 


पर्यटन क्षेत्रातील नवा ट्रेंड 
ग्रामीण भागातील शेतात पर्यटन करण्याचा नवा ट्रेंड जिल्ह्यात सुरु झाला. पर्यटकांना निसर्गाच्या जवळ जाणे आवडते हे खरे आहे. पण, हा ट्रेंड अजूनही पूर्णतः रुजला नाही. शासनाकडून चालना मिळाल्यास या नव्या पर्यटनाचा लक्षवेधी विस्तार होऊ शकतो. जिल्ह्यातील पर्यटनात अलीकडे आलेला या देडला शासकीय योजनांचे बळ मिळाले पाहिजे. 


ताडोबातील विदेशी पर्यटक
२०१८ - २०१९ : ८२०८
२०१९ - २०२२ : ४१७२
२०२० - २०२१ : १९०
२०२१ - २०२२ : ४७७
२०२२ - २०२३ : ६७६७


वढा तीर्थक्षेत्राला २५ कोटी 
चंद्रपूर तालुक्यातील वडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील २५ कोटींच्या आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. या तीर्थक्षेत्राला १८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा नियोजन समितीने 'ब' दर्जा प्रदान केला.


बॉटनिकल गार्डन ठरले लोकप्रिय 
विज्ञान व स्थानिक पर्यावरणाशी संलग्न उभारण्यात आलेल्या बल्लारपुरातील बॉटनिकल गार्डनमध्ये आता पर्यटकांची संख्या वाढली, तिथल्या पायाभूत सुविधा, माहिती, मनोरंजन व ज्ञानवर्धक साधनांमुळे आकर्षणाचे केंद्र ठरले. जिल्ह्याबाहेरून शेकडो पर्यटक या गार्डनला भेट देऊन आनंद घेत आहेत. 


प्रादेशिक पर्यटन विकास विभागंतर्गत पर्यटन स्थळ 
ताडोबा-मोहर्ली पर्यटन स्थळ, महाकाली मंदिर चंद्रपूर, सोमनाथ तहसील मूल, बालाजी मंदिर चिमूर, तहसील भद्रावती शहर पर्यटन स्थळ, तहसील ब्रह्मपूरी वनविभाग येथे वनपर्यटनाची कामे, शिवलिंग कालिपुत्र व नवनाथ मंदिर भलेशवर ब्रह्मपुरी. 


 

Web Title: Tadoba project boom in tourism; Ignore other beautiful places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.