१ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद; बफर झोन राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:07 PM2022-06-27T13:07:13+5:302022-06-27T13:19:33+5:30

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे.

Tadoba reserve core zone to shut for visitors during rain from July 1 | १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद; बफर झोन राहणार सुरू

१ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद; बफर झोन राहणार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे३० जूनपर्यंतची बुकिंग फुल्ल; तीन महिने राहणार बंद

परिमल डोहणे

चंद्रपूर : जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात व्याघ्रसफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात सुमारे तीन महिने ताडोबा पर्यटनासाठी बंद असतो. यंदाही १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद राहणार आहे. ३० जूनपर्यंतची ऑनलाइन बुकिंग फुल्ल असून, १ जुलैपासूनची कोअर क्षेत्राची ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली आहे.

हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश - विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. त्यामुळे ताडोबाचा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. यंदाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे.

वर्षभरात दोन लाख पर्यटकांची भेट

हमखास व्याघ्रदर्शन होते, अशी ख्याती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची झाली आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक ताडोबा प्रकल्पात पर्यटनासाठी येतात. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वर्षभरात सुमारे १ लाख ९४ हजारांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे. तर मार्च ते मे २०२२ दरम्यान सुमारे ८० हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

पावसाळ्यामुळे दरवर्षी कोअर झोन बंद करण्यात येते. मात्र, बफर झोन पर्यटनासाठी सुरू असते. यंदाही बफर झोनचे १५ ही दरवाजे पर्यटनासाठी सुरू राहणार आहेत.

१ जुलैपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन पर्यटनासाठी बंद राहणार आहे, तर बफर झोन सुरू राहणार आहे.

-डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर

Web Title: Tadoba reserve core zone to shut for visitors during rain from July 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.