ताडोबाची ख्याती सातासमुद्रापलिकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ‘ताडोबा’ असे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर रुबाबदार वाघ दिसतो. वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले ...

Tadoba's fame extends beyond the sea | ताडोबाची ख्याती सातासमुद्रापलिकडे

ताडोबाची ख्याती सातासमुद्रापलिकडे

googlenewsNext
ठळक मुद्देवनमंत्र्यांनी घातली पर्यटन विकासात भर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा सुधारला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘ताडोबा’ असे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर रुबाबदार वाघ दिसतो. वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याची आज ओळख झाली आहे. मागील पाच वर्षात या व्याघ्र प्रकल्पात आमूलाग्र बदल घडून आले. निश्चितच हे बदल सकारात्मक आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची उंची वाढविणारे आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री होताच ताडोबाकडे गांभीर्याने लक्ष दिले. हा प्रकल्प देशातच नाही तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध व्हावा, विदेशातील पर्यटकही ताडोबातील वाघांकडे आकर्षित व्हावे, यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने ताडोबा आणखी विकसित केला. आज ताडोबाची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे.
सेल्फी पार्इंट, अत्याधुनिक रिसोर्ट, आगरझरी बटरफ्लाय गार्डन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील दुपटीने वाढलेली वाघांची संख्या, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे, लाखोंच्या संख्येत विदेशी पर्यटकही दरवर्षी ताडोबाकडे आकर्षित होत आहेत. जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. वाघ-बिबटयाशिवाय या उद्यानात आढळणाºया मगरी आणि गवा हे येथील मुख्य वैशिष्टय आहे. साधारणत: सातशे चौरस किलोमीटर संरक्षित जंगलक्षेत्रात हे उद्यान वसलेले आहेत. ताडोबा प्रकल्प नैसर्गिक वनस्पती आणि जीवसृष्टीने समृद्ध आहे. येथे वाघ, बिबटे, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. ताडोबा अभयारण्यात जागोजागी पाणवठे आहेत. पाणवठयानजीकच मचानाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याने जीवसृष्टी अनुभवण्याचा अपूर्व आनंद येथे मिळतो. ताडोबा अभयारण्यात पर्यटन निवासस्थानांचीही व्यवस्था असल्याने निर्सगाच्या सानिध्यात राहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. २०१८-१९ मध्ये ताडोबातील पर्यटकसंख्या सुमारे पावणेदोन लाखांवर पोहचली. यंदा चंद्रपूरचा पारा ४८ अंश सेल्सिअसवर गेला. तरीही पर्यटकांनी ताडोबाची पर्यटनवारी सोडली नाही.

जंगलातील वृक्षतोडीला आळा
ताडोबा प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात अजूनही काही गावे वसली आहेत. जंगलाची मदत घेत येथील ग्रामस्थ राहत आहेत. स्वयंपाकासाठी वृक्ष तोड केली जाते. यामुळे जंगलाचा ºहास होतो. त्यामुळे दृरदृष्टी असलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व बफर क्षेत्रातील जंगलात मानवी हस्तक्षेप वाढू नये, यासाठी बफर क्षेत्रातील गावात एलपीजी गॅस कनेक्शन वाटप केले. सोलर लाईट उपलब्ध करून दिले. परिणाम चुलीवर स्वयंपाक बंद होऊन वृक्षतोडीला आळा बसला.

‘फॅम टूर’चा सकारात्मक परिणाम
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पर्यटकाचा ओघ वाढविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने शासनाने कंबरच कसली. यासाठी खास 'फॅम टूर'चे आयोजन करण्यात आले होते. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'ट्रॅव्हल्स एजन्ट्स व टूर आॅपरेटर्स'नी सहभाग घेतला. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहे.

विद्यार्थ्यांना मोफत पर्यटन
आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ दरम्यानमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे 'चला ताडोबा' या योजनेच्या अनुषंगाने दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत निसर्ग पर्यटनाचा लाभ देण्यात आला व त्यांना डॉक्युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षण व वनसंवर्धनाबाबत जागृती निर्माण होऊन पर्यावरणाचे महत्त्व त्यांना समजेल, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी केलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी व इतर राज्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्याचबरोबर, अंध, अपंग व वृद्धाश्रमातील लोकांना मोफत निसर्ग पर्यटनाचा लाभ देण्यात आलेला आहे.

वाघांची सख्या ४८ वरून ८६ वर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. ताडोबात पूर्वी ४८ वाघ होते. मात्र मागील पाच वर्षात ताडोबात वाघांची संख्या वाढून ती ८६ वर पोहचली आहे. ताडोबात वाघांसाठी पोषक वातावरण तयार करण्यात वनमंत्री मुनगंटीवार आणि त्यांचा वनविभाग यशस्वी झाल्याचेच यावरून दिसते. मागील काही दिवसांपासून ताडोबातील पर्यटकांना आपल्या दोन बछडयासह वावरत असलेल्या माया नावाच्या वाघिणीने भुरळ घातली आहे. जागतिक दर्जाचे वाईल्ड लाईफ फिल्म मेकर, दिग्दर्शक असलेले नल्ला मुत्थू हे आता ताडोबातील माया वाघिणीवर माहितीपट तयार करीत आहे. यासाठी मागील दहा महिन्यांपासून ते ताडोबात आहेत. ताडोबावर असा माहितीपट तयार व्हावा, इतकी ताडोबाची कीर्ती होण्यामागे वनमंत्री मुनगंटीवारांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न आहेत, हे कुणी नाकारू शकणार नाही.

Web Title: Tadoba's fame extends beyond the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.