ताडोबात आता दिवसभर व्याघ्रसफारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 10:35 AM2022-11-13T10:35:27+5:302022-11-13T10:35:54+5:30

Tadoba: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी ताडोबाच्या बफर झोनमध्ये दिवसभर पर्यटन सफारीची योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. 

Tadobat tiger safari all day now! | ताडोबात आता दिवसभर व्याघ्रसफारी!

ताडोबात आता दिवसभर व्याघ्रसफारी!

Next

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी ताडोबाच्या बफर झोनमध्ये दिवसभर पर्यटन सफारीची योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. 
 ताडोबा कोअर क्षेत्रात पूर्णवेळ सफारी सुरू आहे. ताडोबा व्यवस्थापनाने एकाच मार्गावर मोहर्ली बफर क्षेत्रात मोहर्ली-आडेगाव-देवाडा-आगरझरी-जुनोना यांचा समावेश आहे. दिवसभर सफारी सुरू करण्याचा निर्णय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने ७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक हे ताडोबात दिवसाची सफारी कशी असणार, याची कार्यपद्धती तयार करणार आहेत.

ताडोबा भवन उभारणार
मुंबई : ताडोबा येथे पर्यटकांना उत्कृष्ट सेवासुविधा मिळायलाच हव्यात. ताडोबा भवनासाठीचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक व सोलरवर वाहने असावीत,   कर्मचाऱ्यांसाठी चंद्रपूर, मूल आणि चिमूर येथे निवासस्थानाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

Web Title: Tadobat tiger safari all day now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.