रुग्णसेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपदरीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:42+5:302021-06-22T04:19:42+5:30
सोमनाथपूर वॉर्डात पुष्पा इरकुलवार या महिलेचे झोपडीवजा घर आहे. पावसात तिचे घर पूर्णपणे गळू लागले. मात्र मजुरी करून ...
सोमनाथपूर वॉर्डात पुष्पा इरकुलवार या महिलेचे झोपडीवजा घर आहे. पावसात तिचे घर पूर्णपणे गळू लागले. मात्र मजुरी करून आपले जीवनयापन करताना गळणाऱ्या घरातच आपल्या लहान मुलीसह ही विधवा महिला राहात होती. याची माहिती हेल्पिंग हॅन्ड संस्थेच्या कृतिका सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या समूहातील सदस्यांना माहिती दिली. संकटमोचन हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात इरकुलवार यांना ही ताडपत्री देण्यात आली. यावेळी कृतिका सोनटक्के, स्नेहा चांडक, अमृता धोटे, वज्रमाला बदकमवार, सुनीता जमदाडे, रजनी शर्मा, स्वरुपा झंवर, भावना रागीट, संतोष झंवर, लता चांडक, रचना नावंदर, कंचन चांडक, रमा आयटलावार, सीमा कलसे आदी सदस्या उपस्थित होत्या.
===Photopath===
210621\img-20210619-wa0250.jpg
===Caption===
हेलपिंग संस्थेकडून मदत करताना