ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:30 PM2018-01-31T23:30:51+5:302018-01-31T23:31:09+5:30
ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विविध तक्रारी असतात. अधिकाऱ्यांनी ‘त्या’ तक्रारीची दखल घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
सावली : ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विविध तक्रारी असतात. अधिकाऱ्यांनी ‘त्या’ तक्रारीची दखल घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय सावलीतर्फे तालुक्यातील निफंद्रा येथील प्रविणभाऊ आडेपवार महाविद्यालयात समाधान योजना शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उषा चौधरी, जि. प. बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प. सदस्य वैशाली शेरकी, मनीषा चिमूरकर, पं. स. सभापती छाया शेंडे, उपसभापती तुकाराम ठिकरे, पं. स. सदस्य उर्मिला तरारे, मनीषा जवादे, गणपतराव कोठारे, संगीता चौधरी, रवी बोनीवार, सरपंच रेखा निकोडे, सरपंच राजेश सिद्धम, माजी जि. प. सदस्य दिनेश चिटनुरवार, काँग्रेस महिला कमिटीच्या महासचिव नंदा अल्लूरवार आदी उपस्थित होते.
यावेळी आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, अधिकाºयांनी प्रमाणिकपणे कार्य करावे, अन्यथा त्यांच्यावर कार्यवाहीचा करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविकेतून तहसीलदार उषा चौधरी यांनी महाराजस्व अभियान २०१७-१८ अंतर्गत करण्यात येणाºया विविध कामाबाबतची माहिती देऊन विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना घेता यावा, याकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केले. सदर शिबिरात महसूल विभागातर्फे ३० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच रेशन कॉर्ड, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवास दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र संजय गांधी योजनेची माहिती पुस्तिका व अर्जाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १७ लाभार्थ्यांना तीन लाख ४० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. संचालन सहायक गट विकास अधिकारी ए. डी. वाळके यांनी तर आभार नायब तहसीलदार स्मृती पुसदकर यांनी मानले. यावेळी नायब तहसीलदार सागर कांबळे, प्रवीण चिडे, डि. जे. खाटीक उपस्थित होते.