अवैध बांधकाम करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करा

By admin | Published: August 23, 2014 11:55 PM2014-08-23T23:55:22+5:302014-08-23T23:55:22+5:30

बल्लारपूर नगरपरिषदेच्या २०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या अवैध बांधकाम आहे. या प्रकरणाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी निर्भय

Take action against the Municipal Corporation of the illegal construction | अवैध बांधकाम करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करा

अवैध बांधकाम करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करा

Next

चंद्रपूर: बल्लारपूर नगरपरिषदेच्या २०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या अवैध बांधकाम आहे. या प्रकरणाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी निर्भय बनो युवा आरटीआय कार्यकर्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. या मागणीसाठी चळवळीचे संतोषकुमार शेडमाके यांनी २० आॅगस्टपासून बल्लारपूर नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे, निवडून आल्यानंतर नगरसेवकांकडून अवैध बांधकाम सातत्याने सुरू आहे. परंतु नगरपरिषदेने त्यांच्या अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वीसुद्धा तक्रार करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनसुद्धा नगरसेवकांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत आहे. कारवाईसाठी प्रशासनाची चालढकल नगरसेवकांना पाठबळ देणारी आहे. यात दिलीप माकोडे, शिवचंद त्रिवेदी, यल्लया दासरफ, चंदनसिंग चंदेल, शांताबाई बहुरिया, युसूफखान नासिरखान, सुनिल कुल्दीवार, कांता ढोके, संपत कोरडे या नगरसेवकांचा समावेश असल्याचे शेडमाके यांनी म्हटले आहे.
बांधकामाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर महाराष्ट्र नगरपरिषद व औद्योगिक नगर अधिनियम १६५ च्या कलम ४४ (१) (ई) नुसार कारवाई करावी अन्यथा जिल्हा प्रशासनाविरुद्ध तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संतोषकुमार शेडमाके यांनी दिला आहे. त्यांनी आता बल्लारपूर नगरपरिषदेजवळ उपोषण सुरू केल्याने आता प्रशासन या आंदोलनाची काय दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Take action against the Municipal Corporation of the illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.