दीक्षाभूमीवर क्रॉफ्ट मेला लावण्याची परवानगी देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 01:08 AM2016-01-10T01:08:18+5:302016-01-10T01:08:18+5:30
चंद्रपूर येथील पावन दीक्षाभूमीवर क्रॉफ्ट मेला लावण्यात येवू नये, अशी मागणी मागील तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी या संस्थेकडे ...
रिपब्लिकन सेनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर येथील पावन दीक्षाभूमीवर क्रॉफ्ट मेला लावण्यात येवू नये, अशी मागणी मागील तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी या संस्थेकडे जनतेच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र ही मागणी धुडकावून यावर्षीदेखील संस्थेच्यावतीने क्राफ्ट मेला लावण्याची परवानी दिली. त्यामुळे क्राफ्ट मेला लावण्यासाठी परवानगी देणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
याकृतीचा निषेध नोंदविण्याकरिता नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला गेले असता, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर यांनी भेटायला टाळाटाळ करुन नकार दिला. या कृतीचा रिपब्लिकन सेना व उपस्थित पुष्पगुफा महिला मंडळ आणि रमाबाई बुद्ध विहारातील पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेटू घेतली. क्रॉफ्ट मेला लावण्यात येत असल्याने पावन दीक्षाभूमीचे पावित्र्य सदर संस्था नष्ट करीत असल्याचा आरोपी यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून रोष निर्माण झाला आहे.
व्यवसाय करण्यासाठी परवानगी देऊन व्यावसायिक प्रतिष्ठान बनवू पाहणाऱ्या सदर संस्थेविरुद्ध कारवाई करावी अन्यथा शहरातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी अॅड. जगदीश खोब्रागडे, डॉ. फुलझेले, प्रशांत मेश्राम, सचिन उमरे, संदीप सोनोने, संदीप खोब्रागडे, सतीश निमसरकार, मनोज गावंडे, लक्की पाटील, चंद्रकिरण तामगडे, संजय तामगडे, दीक्षांत पाथार्डे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)