प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:02+5:302021-09-23T04:31:02+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे अनेक उ्द्योग येथे आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून ...

Take action against polluting industries | प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करा

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करा

Next

चंद्रपूर : चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे अनेक उ्द्योग येथे आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषावर उद्योगाची उभारणी तसेच प्रदूषण निर्मूलनासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. असे असतानाही येथे नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवक सचिन भोयर यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरचे कार्यालय शहरात शोभेची वस्तू ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वायू, जल, ध्वनी प्रदूषण वाढत आहे. मात्र प्रदूषण पसरवणाऱ्या उद्योगांवर कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक कारवाई केली जात नाही. उद्योगांतर्फे वृक्षारोपण व त्यांचे संवर्धनदेखील केले जात नाही. वाढते प्रदूषण चंद्रपुरातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रालगत दुर्गापूर गावात पावसासोबत केमिकलयुक्त फेसाळ ढग कोसळले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, या उद्योगांवर त्वरित कारवाई करून प्रदूषण आटोक्यात न आणल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर यांच्यासह मनवासे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, राजू बघेल, शोभा वाघमारे, प्रतिमा ठाकूर,असलम शेख, जब्बार भाई, राकेश पराडकर, राकेश लांडे, भारत जोगी

आदींनी दिला आहे.

Web Title: Take action against polluting industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.