नागरिकांना त्रास देणाऱ्या राशन दुकानदारांवर कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:21+5:302020-12-15T04:44:21+5:30

फोटो : तहसीलदारांना निवेदन देताना शिष्मंडळ. भद्रावती : शहरातील राशन दुकानरांकडून सर्व साधारण नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत ...

Take action against ration shopkeepers who harass citizens | नागरिकांना त्रास देणाऱ्या राशन दुकानदारांवर कार्यवाही करा

नागरिकांना त्रास देणाऱ्या राशन दुकानदारांवर कार्यवाही करा

Next

फोटो : तहसीलदारांना निवेदन देताना शिष्मंडळ.

भद्रावती : शहरातील राशन दुकानरांकडून सर्व साधारण नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशा राशन दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहरातील साधारण नागरिक आपली रोजी बुडवून राशन घेण्यासाठी जातात. मात्र दुकानदार माल संपला आहे. आज दुकान बंद आहे, तुमचे राशन आले नाही, असे कारणे सांगून टाळत असतात. त्यामुळे अनेकांना वापस जावे लागते. अशा दुकानदारांवर कारवाई करावी, राशन दुकानाचा वेळ, आठवड्यातील दिवस याची माहिती ठळक अक्षरात दुकानाच्या दर्शनी भागावर लावावा, चालू महिण्यात कोणते धान्य व मिळणार याचे फलक लावावे, आलेले राशन, वितरीत राशन व उपलब्ध साठा याबाबतचे फलक लावावे, आदी विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रवीण चिमुरकर, वामन नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, पुरूषोत्तम मत्ते, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे, मोहन मारगोनवार आदी उपस्थित होते.

Web Title: Take action against ration shopkeepers who harass citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.