चुकीचे गुन्हे दाखल करणाºयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:50 AM2017-08-30T00:50:15+5:302017-08-30T00:50:30+5:30
चिमूर शहीद क्रांती दिनी विविध मागण्यांचे फलक लावायाच्या कारणावरूण चिमूरच्या ठाणेदाराने सत्य परिस्थिती न पाहता भाजपा कार्यकत्यांच्या खोट्या तक्रारीवरून .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर शहीद क्रांती दिनी विविध मागण्यांचे फलक लावायाच्या कारणावरूण चिमूरच्या ठाणेदाराने सत्य परिस्थिती न पाहता भाजपा कार्यकत्यांच्या खोट्या तक्रारीवरून डॉ. सतीश वारजूरकर यांच्यासह कार्यकत्यांवर चुकीने गुन्हे दाखल केले. या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परीषद काँग्रेसगट नेते डॉ . सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
१६ आॅगस्ट चिमूर शहिद क्रांती दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री येत असल्याने १५ आॅगस्टला चिमूर तालुका काँग्रेस पक्षातर्फे शहिदांना श्रद्धांजलीचे, चिमूर जिल्हा झालाच पाहीजे, शेतकºयांची कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरी नाही, वेगळा विदर्भ, ओबीसी शिष्यवृत्ती बंद करणे अयोग्य, माना जमातीची जातपडताडणी, अनुसुचित जाती जमातीची शिष्यवृत्ती कमी करणे अयोग्य आहे, चिमूर नगर परीषदेतील भ्रष्टाचार, गोसेखुर्द, मोखाबर्डीचे रखडलेले काम, गोसेखुर्द प्रकल्पातील भ्रष्टाचार करणाºयावर कार्यवाही इत्यादी विषयी बॅनर लावण्याचे काम सुरू होते.
बॅनर लावत असताना आ. बंटी भांगडिया यांनी ‘आज के बाद काँग्रेसके बॅनर नही लगेंगे’ असे म्हणून बॅनर असलेल्या गाडीची चाबी हिसकावली. व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धमक्या देऊन मारहाण केली. तसेच ठानेदारामार्फत गाडी पोलीस स्टेशनला लावली. त्या वेळेस १० फलक चोरी गेले. याविषयी काँग्रेस पक्षातर्फे तक्रार दिली असता चिमूर पोलिसांनी स्वीकारली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. याप्रमाणे भाजपा आमदार व कार्यकत्याविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले. यानंतर भाजपा कार्यकत्यांनी डॉ. सतीश वारजुरकर , विनोद ढाकुणकर, पप्पू शेख हे हजर नसताही आमदाराच्या दबावात येऊन चुकीने गुन्हे दाखल केले. अशा कर्तव्यशून्य अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी जि. प. काँग्रेसगटनेते डॉ. सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष माधव बिरजे, नगरसेवक कदीर शेख, विनोद ढाकुणकर, विनोद राऊत, अविनाश अगडे, पप्पू शेख, जगमित्र लोखंडे, रूपचंद शास्त्रकार, दिवाकर येवले उपस्थित होते.