सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत तत्काळ निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:04+5:302021-08-22T04:31:04+5:30

चिमूर : राज्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. हा वेतन आयोग लागू होऊन बरीच वर्षे झाली ...

Take immediate action on the arrears of the Seventh Pay Commission | सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत तत्काळ निर्णय घ्या

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत तत्काळ निर्णय घ्या

Next

चिमूर : राज्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. हा वेतन आयोग लागू होऊन बरीच वर्षे झाली तरी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या थकबाकी बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय शासनस्तरावर झाला नसल्याने शिक्षक भारतीने यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग सोबत पत्रव्यवहार केला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या थकबाकी बाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी वेळोवेळी शिक्षक भारतीने केली होती.

या पाठपुराव्याला यश येऊन अलिकडे महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी रोहिणी किरवे यांच्या स्वाक्षरीचे पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांना प्राप्त झाले असून शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने वित्त विभागाला विनंती केली असल्याचे कक्ष अधिकारी यांनी कळविले आहे, अशी माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय सल्लागार रावन शेरकुरे, संघटक रवींद्र उरकुडे, जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,विलास फलके, विरेनकुमार खोब्रागडे यांनी दिली आहे.

Web Title: Take immediate action on the arrears of the Seventh Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.